IND VS NZ live : पहिल्या डावात वॉशिंग्टनच्या 'सुंदर' गोलंदाजी रहस्य काय?

पुणे येथील दुसऱ्या कसोटीत 59 धावांवर घेतले 7 बळी
IND vs NZ Test
पुुणे येथील कसोटी सामन्यामध्ये पहिल्या दिवशी पहिल्या डावांत सुंदरने 59 धावा देत 7 बळी घेतले.Pudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोशियनच्या मैदानावर खेळवला जात आहे. यातील पहिला दिवस हा भारतीय संघाच्या नावावर राहिला. पहिल्या दिवशी भारताच्या फिरकी गोलंदाजीच्या नावे राहिला. यामध्ये तीन वर्षानंतर कसोटी संघामध्ये पुनरागमन करणाऱ्या वॉशिंग्टनने 'सुंदर' गोंलदाजी करत न्यूझीलंडचे सात खेळाडू तंबूत परत पाठवले. त्यामध्ये पाच खेळाडू त्रिफळाचीत केले हे विशेष.

या गोलंदाजीचे श्रेय 'रणजी' क्रिकेटला : वॉशिंग्टन

न्यूझीलंडच्या संघाला एकट्याने नेस्तनाबूत केल्यानंतर बोलताना सुंदर म्हणाला, मी या खेळीचे श्रेय तमिळनाडू रणजी क्रिकेटला देईन. रणजी खेळताना मला अधिक मॅच सराव करताना मिळाला. तिथे केलेल्या सरावचा फायदा मला या कसोटी सामन्यामध्ये झाला. त्यामुळे मी माझी कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करु शकलो. यावर्षी तमिळनाडूकडून क्रिकेट खेळताना दिल्ली संघाच्या विरोधात सुंदरने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 152 धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर गोंलदाजीमध्ये 6 बळी घेतले होते. या प्रदर्शनाला लक्षात घेऊन प्रमुख कोच गौतम गंभीर याने दोन कसोटीमध्ये सुंदरचा सहभाग करुन घेतला. गंभीरचा हा निर्णय भारताच्या हिताचा ठरला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news