Virat And Rohit Retirement : टी-20 निवृत्तीनंतर मिळणार रोहित-विराटला पेन्शन?

निवृत्तीनंतरसुद्धा विराट आणि रोहितला मिळणार वर्षाला लाखो रुपये
Rohit-Virat will get pension after retirement
रोहित-विराटला निवृत्तीनंतर मिळणार पेन्शनPudhari File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : 29 जून 2024 हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला आहे. टीम इंडियाने बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना 7 धावांनी जिंकून विश्वचषक जिंकला. 17 वर्षांची प्रतीक्षा संपवून टीम इंडियाने 2007 नंतर विश्वचषक जिंकला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने संपूर्ण विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केली.

कर्णधार रोहित शर्माने स्वतः फलंदाजी करत आघाडी घेतली. त्यामुळे अंतिम सामन्यात जेव्हा कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. त्यानंतर टीम इंडियाचा दिग्गज विराट कोहलीने जबाबदारी स्वीकारली आणि संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. अंतिम सामन्यानंतर, भारतीय संघाचे दोन दिग्गज, रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. आता त्यांना पेन्शन देणार का, असा प्रश्न जनतेला पडला आहे.

Rohit-Virat will get pension after retirement
Virat Kohli Dance : विराट-अर्शदीपचे भांगडा सेलिब्रेशन! ‘तुनक-तुनक’ गाण्यावर लुटली मैफील

विराट-रोहित दोघांना मिळणार पेन्शन

बीसीसीआय भारतीय क्रिकेटपटूंना निवृत्तीनंतर पेन्शन देते. यासाठी बीसीसीआयचे काही नियम आणि कायदे आहेत. यासाठी खेळाडूंना ठराविक प्रमाणात सामने खेळावे लागतात. त्या आधारे त्याला पेन्शन दिली जाते. बीसीसीआयचा पेन्शन स्लॅब प्रथम श्रेणी सामने आणि कसोटी क्रिकेट सामन्यांच्या आधारे तयार करण्यात आला आहे.

जर एखाद्या खेळाडूने भारतासाठी 25 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले असतील तर त्याला दरमहा 70 हजार रुपये पेन्शन म्हणून दिले जातात. तर 25 पेक्षा कमी कसोटी सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना दरमहा 60 हजार रुपये पेन्शन दिले जाते. या नियमांनुसार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही दिग्गजांना पेन्शन मिळणार आहे.

Rohit-Virat will get pension after retirement
"एका उच्चांकावर..." : रोहित-विराटसाठी सचिन तेंडुलकरची भावनिक पाेस्‍ट

बीसीसीआयची पेन्शन योजना

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय हे जगातील सर्वात श्रीमंत मंडळ आहे. बीसीसीआयमध्ये केवळ माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसाठीच नाही तर प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंनाही पेन्शनची तरतूद आहे. बीसीसीआय पेन्शन योजने अंतर्गत, 2003 पूर्वी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त झालेले आणि 1 ते 74 सामने खेळलेले क्रिकेटपटू त्यांना दरमहा 30 हजार रुपये निवृत्ती वेतन दिले जाते. 75 पेक्षा जास्त प्रथम श्रेणी सामने खेळणाऱ्या खेळाडूंना 45 हजार रुपये पेन्शन मिळते. बीसीसीआय महिला क्रिकेटपटूंनाही पगार देते. 5 ते 9 कसोटी खेळलेल्यांना 30 हजार रुपये दिले जातात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news