Vinod Kambli Latest Advertisement: जिनके लिये लाईफ मे कम मिला.... विनोद कांबळीचं 'कमबॅक', फ्लॅमबॉय जाहिरातीच्या पीचवर परतला

Vinod Kambli Latest Advertisement
Vinod Kambli Latest Advertisementpudhari
Published on
Updated on

Vinod Kambli Latest Advertisement: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही काळापासून त्याच्या डाऊन फॉल आणि शारीरिक व्याधींबाबत जास्त चर्चेत होता. मध्यंतरी त्याची प्रकृती अत्यंत खालवली होती. तसेच त्याची आर्थिक स्थिती देखील अत्यंत बेताची झाली आहे.

मात्र या माजी क्रिकेटपटूने आपली जिद्द सोडलेली नाही. त्याने कमबॅक करण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. नुकतेच विनोद कांबळी हा एका जाहिरातीत झळकला आहे. त्याने एका आईसक्रीम ब्रँडची जाहिरात केली असून यात विनोद कांबळीच्या परिस्थितीचा भावनिकरित्या उत्तम वापर करून घेण्यात आला आहे.

Vinod Kambli Latest Advertisement
Algorithm | ‘विघातक अल्गोरिदम’ला दणका

जिनको लाईफ मे थोडा कम मिला...

त्याचा जिनको लिये लाईफ मे कम मिला उनके लिया थोडा ज्यादा... हे वाक्य मनाला स्पर्श करून जातं. ही जाहिरात ज्यावेळी आईस्क्रीमची मागणी प्रचंड असते त्या उन्हाळ्याच्या काळात आली आहे.

विनोद कांबळीला या जाहिरातीत घेऊन या आईस्क्रीम कंपनीने त्याच्या आयुष्यातील चढ उतार आणि गुणवत्ता असून मागे पडलेला खेळाडू याचा आपल्या जाहिरातीसाठी वापर करून घेतला. जाहिरातीतील विनोद कांबळीचा रोल पाहिला तर त्याची प्रकृती फार चांगली आहे असं जाणवत नाही. त्याला शब्द उच्चारताना अजून त्रास होत असल्याचे जाणवते.

Vinod Kambli Latest Advertisement
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या प्रकृतीत सुधारणा

जोरदार कमबॅक

विनोद कांबळी गंभीर आजारामुळे त्रस्त आहे. त्याला उपचारासाठी देखील पैसे नाहीयेत. त्यामुळे वेळोवेळी माजी क्रिकेटपटू त्याला आर्थिक मदत करण्याचे आवाहन करत असतात. अशातच आता विनोद कांबळीची ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे आता विनोद कांबळी हा आयुष्याच्या या टप्प्यावर देखील जोरदार कमबॅक करणार अशी आशा पल्लवीत झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news