Vaibhav Sooryavanshi In MI: मुंबई इंडियन्स वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्समधून 'उचलणार'... IPL मधील सर्वात मोठा स्विच होणार?

Vaibhav Sooryavanshi In MI: मुंबई इंडियन्स वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्समधून 'उचलणार'... IPL मधील सर्वात मोठा स्विच होणार?
Published on
Updated on

Vaibhav Sooryavanshi In Mumbai Indians: नुकत्याच झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या सामन्यात राजस्थानच्या वैभर सूर्यवंशीने धमाका केला. त्यानं भारताचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराहसह मुंबईच्या प्रत्येक गोलंदाजाची यथेच्छ धुलाई केली. त्याने १४ चेंडू ३९ धावा ठोकल्या. त्यात पाच षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. यातील दोन षटकार हे बुमराहला मारले होते.

वैभव सूर्यवंशीच्या जडणघडणीत राजस्थान रॉयल्सचा मोठा वाटा आहे. राजस्थानची अशा प्रकारच्या गुणवान खेळाडूंना तयार करण्याचा इतिहास राहिलेला आहे. त्यांनी संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रियान पराग असे अनेक खेळाडू तयार केले आहेत. आता यात वैभव सूर्यवंशीचा देखील समावेश झाला आहे.

Vaibhav Sooryavanshi In MI: मुंबई इंडियन्स वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्समधून 'उचलणार'... IPL मधील सर्वात मोठा स्विच होणार?
Sanju Samson Video: ‘उडा देंगे सर’… वैभव सूर्यवंशीचं धाडस; संजू सॅमसनने सांगितला IPL डेब्यूचा किस्सा

वैभवर मुंबई इंडियन्सचा डोळा

असं असलं तरी राजस्थानने काही धक्कादायक निर्णय देखील घेतले आहेत. त्यांनी संजू सॅमसन आणि जॉस बटलर यांना रिलीज करण्याचा देखील निर्णय घेतला होता. आयपीएलचा अनिश्चिततेचा इतिहास पाहता मुंबई इंडियन्सने वैभव सूर्यवंशीमध्ये रस दाखवला तर आश्चर्य वाटायला नको. आता नाहीतर नंतर मुंबई वैभव सूर्यवंशीसाठी आपला जोर लावण्याची दाट शक्यता आहे.

Vaibhav Sooryavanshi In MI: मुंबई इंडियन्स वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्समधून 'उचलणार'... IPL मधील सर्वात मोठा स्विच होणार?
vaibhav sooryavanshi: '२-३ हजार धावा...'; वैभव सूर्यवंशीने IPL 2026 साठी ठेवले गगनभेदी लक्ष्य; पाहा Video

जतीन परांजपेंचे ट्वीट अन्...

मीज बीसीसीआय निवडसमिती सदस्य जतीन परांजपे यांनी याबाबत ट्विट केलं आहे. त्यांच्या मते सूर्यवंशी मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसण्याची शक्यता वर्तवली आहे. ते आपल्या एक्स ट्विटमध्ये म्हणतात, 'आज रात्री वैभव सूर्यवंशी हा आपल्या भविष्यातील टीमविरूद्ध खेळला आहे.'

आता हे कधी होणार? कसं होणार? राजस्थान यासाठी तयार होणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आयपीएल ही मजेशीर लीग आहे. काहीही गृहीत धरणं अतिशोयक्तीची ठरू शकतं. याचं उदाहरण म्हणजे मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला पुन्हा आपल्या संघात घेणे. ज्या प्रकारे गुजरात टायटन्सबाबत झालं अशाच प्रकारे राजस्थान रॉयल्सबाबत देखील होऊ शकतं.

वैभव कधी टीम स्विच करणार?

खूप काळापासून असं मानलं जात होतं की यशस्वी जैस्वाल हा मुंबई इंडियन्सच्या टार्गेटवर होता. मुंबई चांगले गुणवान खेळाडू आपल्या गोटात खेचताना मागे पुढे पहात नाही. इशान किशन, जोफ्रा आर्चरचेच उदाहरण घ्या. सूर्यवंशीच्या बाबतीत हा फक्त काही काळाचा विषय आहे. वैभव सूर्यवंशीचे ट्रान्सफर हे आयपीएल इतिहासातील सर्वात मोठे ट्रान्सफर ठरण्याची शक्यता आहे. मग त्यासाठी ट्रेडचा वापर केला जाईल किंवा लिलावात त्याच्यावर मोठी बोली लावली जाईल. तो आयपीएल इतिहातील सर्वात श्रीमंत किशोरवयीन खेळाडू ठरू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news