Vaibhav Sooryavanshi Debut: वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणावर 'वरून' आडकाठी... कोणत्या गोष्टीमुळं १५ वर्षाच्या खेळाडूचं वाढलं टेन्शन?

Vaibhav Sooryavanshi Debut
Vaibhav Sooryavanshi Debutpudhari
Published on
Updated on

Vaibhav Sooryavanshi Debut: भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी २० मालिकेचा पहिला सामना आज शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता सुरू होणार आहे. हा सामना बेलफास्टच्या सिविल सर्विस क्रिकेट क्लबमध्ये होत आहे. याच सामन्यातून भारताचा १५ वर्षाचा धाडाकेबाज खेळाडू वैभव सूर्यवंशी आपलं आंतरराष्ट्री पदार्पण करण्याची शक्यता आहे. त्याला पहिल्याच सामन्यात प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्याच्या या पदार्पणावर वरून आडकाठी येण्याची शक्यता आहे. या सामन्यावर पावसाचे ढग दाटले असून वैभवचे पदार्पणावर पाणी फिरण्याची शक्यता आहे.

Vaibhav Sooryavanshi Debut
Vaibhav Sooryavanshi : 'मला फक्त एवढीच आशा..'; वैभव सूर्यवंशीच्या टीम इंडियाकडून पदार्पणापूर्वी राहुल द्रविडचा मोलाचा सल्ला

सामन्यादरम्यान पावसाची शक्यता?

बीबीसी वेदरच्या अंदाजानुसार शुक्रवारी पूर्ण दिवस बेलफास्टमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच थांबून थांबून पावसाची देखील शक्यता आहे. सामन्याच्या वेळी पावसाची शक्यता ही ३० ते ४३ टक्के इतकी सांगितली जात आहे. या दिवशी तापमान हे २२ ते २३ डिग्री असण्याची शक्यता आहे. या दिवसी सामना होण्याची शक्यता आहे मात्र थांबून थांबून पाऊस मोठी अडचण निर्माण करू शकतो.

Vaibhav Sooryavanshi Debut
Vaibhav Suryavanshi: भारतीय संघात पदार्पण करण्यापूर्वीच वैभव सूर्यवंशीला इशारा; सौरव गांगुली काय म्हणाला हे वाचून बसेल धक्का

पदार्पणाचा सामना पावसात जाणार वाहून?

सध्या हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार मोठा पाऊस नसला तरी दिवसभर ड्राय स्पेल देखील राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण सामना रद्द होण्याची शक्यता नाही. मात्र पाऊस व्यत्यय आणू शकतो.

गेल्या काही दिवसांपासून बेलफास्टचे वातावरण सतत बदल आहे. त्यामुळं अचूक हवामान अंदाज देणं कठिण आहे. या दिवशी वेगवान वाऱ्याची शक्यता नाही. त्या सामन्यात जर वैभवला प्लेईंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली तर तो इतिहास रचू शकतो. मात्र त्याचा हा ऐतिहासिक सामना हा पावसावर अवलंबून आहे.

Vaibhav Sooryavanshi Debut
Vaibhav Sooryavanshi | १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीसोबत आई-वडीलही करणार टीम इंडियाचा परदेश दौरा : BCCIचा मोठा निर्णय!

वैभव रचणार इतिहास

जर वैभव सूर्यवंशीचा समावेश प्लेईंग ११ मध्ये झाला तर तो भारताकडून पुरूष आणि महिला संघाचे मिळून सर्वात कमी वयाचा आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा खेळाडू ठरणार आहे. आयपीएलमधील धमाकेदार कामगिरीनंतर आता संपूर्ण क्रिकेट जगत त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाकडे डोळे लावून बसले आहे.

Vaibhav Sooryavanshi Debut
Vaibhav Sooryavanshi Controversy: गुद्द्यावर येणं चांगलं नाही; सचिन तेंडुलकर देखील... वैभवला माजी खेळाडूने दिला मोलाचा सल्ला

कधी अन् कुठं पाहायचा सामना?

भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला टी २० सामना हा शुक्रवारी २६ जून रोजी बेलफास्ट इथं होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ६ वाजता सुरू होणार आहे. नाणेफेक ही ५.३० मिनिटांनी होणार असून या सामन्याचे थेट प्रक्षेपण हे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. याचे लाईव्ह स्ट्रिमिंग हे सोनी लीव्ह अॅप आणि वेबसाईटवर पाहता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news