vaibhav sooryavanshi impact: पुढचा 'सूर्यवंशी' करण्याचा हट्ट.. नाही म्हणत असतानाही बापानं मुलाला वेगवान गोलंदाजासमोर केलं उभा

vaibhav sooryavanshi impact
vaibhav sooryavanshi impactpudhari
Published on
Updated on

vaibhav sooryavanshi impact : वैभव सूर्यवंशी हा आता देशातील एक युवा क्रिकेटपटू राहिला नसून आता तो मुलांपेक्षा त्यांच्या पालकांचा आयकॉन होऊ लागला आहे. आता प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला किंवा मुलीला पुढचा वैभव सूर्यवंशी करायचं आहे. त्यांना लवकरात लवकर आपला मुल हे आयपीएल खेळण्याच्या लायकीचं व्हायला हवं याची घाई लागली आहे. वयाच्या १४ व्या १५ व्या वर्षी आपल्या मुलाने जगातील सर्व मोठमोठ्या वेगवान गोलंदाजांची धुलाई करायला हवी असं वाटत आहे. मात्र या महत्वकांक्षेचा एक भयानक आणि भीतीदायक अँगल देखील असू शकतो.

vaibhav sooryavanshi impact
Goa tourism issues | गोवा : दाग अच्छे है?

व्हिडिओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका १० ते ११ वर्षाच्या मुलाला त्याचे वडील मोठ्यांच्या नेटमध्ये वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजी करण्यासाठी पाठवत आहेत असं दिसतं. मात्र हा मुलगा एवढ्या मोठ्या आणि वेगाने मारा करणाऱ्या गोलंदाजांचा सामना करण्यासाठी घाबरत असल्याचं दसत आहे. तो कापऱ्या आवाजात आपल्या वडिलांना विरोध करताना दिसत आहे.

vaibhav sooryavanshi impact
Goa Tourisam | गोव्याच्या पर्यटनाचा झंझावात! 2026 च्या पहिल्या 3 महिन्यांत 28.5 लाख पर्यटकांची विक्रमी नोंद

व्हिडिओमध्ये तो मुलगा नाही... मी नाही खेळणार, मला इजा होऊ शकतो असे म्हणतोय.

वडिलांनी बाधला होता चंग

मात्र तरी देखील आपल्या मुलाला पुढचा वैभव सूर्यवंशी करायचंच म्हणून चंग बांधलेला वडील त्याला मोठ्यांच्या नेट्समध्ये फलंदाजी करण्यासाठी पाठवतो. मुलगा मागे हटण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याला वडील वेगवान गोलंदाजांचा सामना करण्यासाठी पाठवतात.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही जन जर मुलगा वेगवान गोलंदाजाला खेळताना घाबरत असताना देखील त्याला त्याचा सामना करण्यासाठी पाठवणे चुकीचे आहे असे म्हणत आहेत. क्रिकेट शिकवणे आणि भीती मोडणे या वेगळ्या गोष्टी आहेत. मात्र जर मुलगाच नाही म्हणत असेल तर त्याला जबरदस्तीने असं करायला लावणं हा मुलावर मानसिक दबाव टाकण्यासारखं आहे.

व्हिडिओवरून वेगवेगळे मतप्रवाह

दुसरीकडं अनेक लोकं या कृतीचं समर्थन करताना दिसत आहेत. त्यांनी याला हार्ड ट्रेनिंगचं नाव दिलं आहे. त्याला मोठा खेळाडू होण्यासाठी भीतीवर मात करणं गरजेच आहे. अनेकांनी वैभव सूर्यवंशीचे उदाहरण दिलं. जर मोठ्या प्लॅटफॉर्मवर यशस्वी व्हायचं असेल तर तसे धाडस देखील पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं आङे.

या व्हिडिओनंतर मुलांना पुढचा वैभव सूर्यवंशी करण्यासाठी त्यांचे पालक, कोच हे त्यांच्यावर अधिक दबाव टाकत आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे. वैभव वयाच्या १५ व्या वर्षी यशस्वी झाला. त्यामुळं आता इतर मुलांना देखील त्याच मापात तोललं जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news