पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा दुसऱ्यांदा पिता झाला आहे. त्याची पत्नी रितीका हिने १५ नोव्हेंबर रोजी मुलाला जन्म दिला. याबद्दल नेटकऱ्यांनी या जोडप्याला सोशल मीडियावर भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. आता मुलाचे नामकरण झाले असून, रोहितची पत्नी रितीकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आपल्या मुलाचे नाव जाहीर केले आहे.
रविवारी इन्स्टावर एक गोंडस फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो कार्टुन डॉलचा आहे. प्रत्येक डॉलसमोर तिने नावे लिहिले आहे. यामध्ये रोहित,रितिका आणि समायरा बरोबरच ‘अहान’ असे लिहिले आहे. या पोस्टमधून रोहित आणि रितिका यांनी आपल्या मुलाचे नाव अहान ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.
आहान नावाचा अर्थ पहाट, सूर्योदय, प्रकाशाचा पहिला किरण असा आहे. अहान हे नाव संस्कृत शब्द ‘अहा’ पासून आले आहे. याचा अर्थ ‘जागणे’ असा होतो. अहान म्हणजे नेहमी शिकण्याचा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती.
सध्या रोहित शर्मा आस्ट्रेलियसा दौऱ्यावर आहे. दरम्यान बोर्डर- गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी तो खेळू शकला नाही कारण मुलाच्या जन्मामुळे तो मुंबईतच थांबला होता.