

कोल्हापूर : रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया या शिखर संघटनेने दक्षिण कोरिया येथे होणार्या 20 व्या एशियन अजिंक्यपद रोलर स्केटिंग स्पर्धा 2025 साठीचा भारतीय संघ नुकताच जाहीर केला. संघात कोल्हापूरच्या तेजस्विनी रामचंद्र कदम हिचा समावेश आहे. भारतीय रोलर डर्बी स्केटिंग संघात तिची सलग दुसर्यांदा निवड झाली आहे.
तेजस्विनी जिल्हा स्केटिंग संघटनेच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्केटिंग प्रशिक्षण केंद्राची खेळाडू असून सध्या नागाळा पार्क येथील फोर्ट इंटरनॅशनल अॅकॅडमीच्या क्रीडा शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. तिला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे. सचिव शुभांगी गावडे, प्रशिक्षक प्रा. डॉ. महेश कदम व भास्कर कदम यांचे प्रशिक्षण लाभत आहे.
तेजस्विनीच्या निवडीबद्दल दसरा चौकातील राजर्षी येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकासमोर अॅड. धनंजय पठाडे, अध्यक्ष अनिल कदम, शेतकरी संघाचे संचालक अण्णा वारके, फोर्ड इंटरनॅशनल अॅकॅडमी नालंदा कॅम्पर्सच्या प्रिन्सिपल शिल्पा वणकुंद्रे, शांताबाई कदम यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी अॅड. कृष्णराज नलवडे, अंबिका पाटील, रामचंद्र कदम, आसनी तावडे, रुपाली चिकोडीकर आदी उपस्थित होते.