

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पाचवा सामना खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशीच्या तिसऱ्या सत्रामध्ये बुमराह आणि कॉन्सटास यांच्यामध्ये राडा झाला. सिडनीमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यादरम्यान बुमराह गोलंदाजी करत असताना नॉन स्ट्राइकवर असलेला कॉन्सटास बुमराहच्या दिशेने येऊ लागला. यानंतर बुमराहही रागाने सॅमकडे गेला. पंचांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले. पण नंतर काही वेळाने असे झाले की, बुमराहने कॉन्स्टसवर ओरडायला सुरुवात केली.
ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या तिसऱ्या षटकात मैदानावर असे काही घडले ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बुमराह ओव्हर्स टाकत होता, स्ट्राइकवर असलेल्या ख्वाजाला ॲक्शन यायला वेळ लागत होता. या प्रकरणामुळे बुमराह थोडासा नाखुश दिसत होता. मात्र दुसरीकडे नॉन स्ट्राईकवर असलेल्या सॅम कॉन्स्टासने अचानक या प्रकरणात उडी घेतली. यानंतर बुमराह रागात सॅमच्या दिशेने आला. दोघेही एकमेकांना काहीतरी बोलताना दिसले. कॉन्स्टन्सचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसतानाही त्याने विनाकारण हस्तक्षेप केला आणि बुमराहही नाराज झाला.
या नंतर बुमराह आणि कॉन्स्टसला पंचांनी लगेच शांत केले. बुमराहने ख्वाजाकडे चेंडू टाकला जो डॉट राहिला. पण पुढच्याच चेंडूवर ख्वाजा बाद झाला. जो ओव्हरचा शेवटचा चेंडू होता आणि पहिल्या दिवसाचा खेळही. केएल राहुलने स्लिपमध्ये ख्वाजाचा झेल घेतला. यानंतर बुमराह कॉन्स्टसवर जोरात ओरडताना दिसला. इतर भारतीय खेळाडूंनीही कॉन्स्टन्ससमोर जोरात ओरडून विकेटचा आनंद साजरा केला.
सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने 3 षटकात ख्वाजाची विकेट गमावत 9 धावा केल्या आहेत. याआधी भारताचा पहिला डाव 185 धावांवर आटोपला होता. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक ४० धावा केल्या. रवींद्र जडेजाने 26 धावांचे योगदान दिले. बुमराहने एक विकेट घेण्यासोबतच संघासाठी महत्त्वाची खेळीही खेळली. त्याने 17 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 22 धावा केल्या. रोहितच्या अनुपस्थितीत बुमराह या सामन्यातही कर्णधारपद भूषवत आहे.