FIFA World Cup 2026 | पेनल्‍टीवर स्‍वित्‍झर्लंड भारी, अर्जेंटिनाविरुद्ध पुढची फेरी!

कोलंबियाचा पाडाव करत स्वित्झर्लंड उपांत्यपूर्व फेरीत
FIFA World Cup 2026 |
FIFA World Cup 2026 | पेनल्‍टीवर स्‍वित्‍झर्लंड भारी, अर्जेंटिनाविरुद्ध पुढची फेरी!
Published on
Updated on

कॅनडा; वृत्तसंस्‍था : फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीत स्वित्झर्लंडने कमालीच्या संयमाचे प्रदर्शन करत कोलंबियाचे आव्हान संपुष्टात आणले. अत्यंत चुरशीच्या आणि बचावात्मक झालेल्या या सामन्यात स्वित्झर्लंडने पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ असा थरारक विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. निर्धारित ९० मिनिटे आणि त्यानंतरच्या ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघांना गोलशून्य कोंडी फोडता आली नाही. अखेर या सामन्याचा निकाल फुटबॉलमधील पेनल्टी शूटआऊटद्वारे लावण्यात आला.

स्वित्झर्लंडच्या विश्वचषक इतिहासातील हा पहिलाच शूटआऊट विजय ठरला असून, तब्बल १९५४ नंतर म्हणजेच ७२ वर्षांनी संघाने पहिल्यांदाच अंतिम आठमध्ये प्रवेश केला आहे. अतिरिक्त वेळेतील थरार आणि कोबेलची कामगिरीसंपूर्ण सामन्यात कोलंबियाचा खेळ अधिक आक्रमक आणि कौतुकास्पद राहिला. अतिरिक्त वेळेत कोलंबियाच्या जॉन लुकमचा हेडर गोलपोस्टच्या क्रॉसबारला आदळला, तर जेमिंटन कॅम्पाझने गोल करण्याची अत्यंत सोपी संधी गमावली. स्विस संघाने मात्र आपल्या उत्कृष्ट बचावात्मक रचनेच्या जोरावर कोलंबियाला रोखून धरले.

पेनल्टी शूटआऊटमध्येही मोठा ड्रामा पाहायला मिळाला. कोलंबियाच्या डेव्हिन्सन सांचेझची पेनल्टी हुकली; पण त्यानंतर स्वित्झर्लंडच्या मॅन्युएल अकांजीने मारलेला शॉट गोलपोस्टच्या वरून गेल्याने सामन्यातील थरार वाढला. या मोक्याच्या क्षणी स्विस गोलरक्षक ग्रेगोर कोबेलने अभेद्य भिंत बनत कुचो हर्नांडेझचा प्रहार उत्कृष्टरीत्या रोखला. यानंतर, दुखापतीची चिंता बाजूला सारत मैदानात उतरलेल्या रुबेन व्हर्गासने पाचवी निर्णायक पेनल्टी अचूक डागत स्वित्झर्लंडच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. कोलंबियाच्या खेळाडूंना या पराभवानंतर अश्रू अनावर होणे साहजिकच होते.

स्वित्झर्लंडसमोर आता अर्जेंटिनाचे आव्हान

स्वित्झर्लंडचा संघ आतापर्यंत स्टार खेळाडूंपेक्षा सांघिक कामगिरी आणि सातत्याच्या जोरावर इथपर्यंत पोहोचला आहे. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य अर्जेंटिनाविरुद्ध त्‍यांचा खर्‍या अर्थाने कस लागू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news