

Suryakumar Yadav On India Vs Pakistan:
आयसीसीने नुकतेच भारतात २०२६ मध्ये होणाऱ्या टी २० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केलं. यावेळी भारत आणि पाकिस्तानचा सामना कधी असणार याची सर्व क्रिकेटप्रेमींना उत्सुकता होती. भारत आणि पाकिस्तान हे ग्रुप A मध्ये १५ फेब्रुवारीला भिडणार आहेत.
नुकतेच हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आशिया कप २०२५ मध्ये आमने सामने आले होते. या स्पर्धेत तब्बल तीनवेळा भारत पाकिस्तान सामना झाला होता. दरम्यान, या स्पर्धेत भारत पाकिस्तान सामन्यावेळी अनेक वादाचे प्रसंग घडले होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसीन नक्वी हे भारतानं जिंकलेली ट्रॉफी घेऊन पळून गेले.
दरम्यान, टी २० वर्ल्डकप २०२६ चे शेड्युल घोषित होताच सूर्यकुमार यादवनं प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यानं भारत पाकिस्तान सामन्याबद्दल बोलताना आशिया कपची आठवण काढली.
सूर्यकुमार यादव म्हणाला, 'आम्ही आशिया कमध्ये नुकतेच त्यांच्याविरूद्ध खेळलो, त्यावेळी खूप चांगला वेळ गेला. त्यावेळी सर्व काही क्रिकेटवरच केंद्रित होतं. इतर कोणत्याही गोष्टी घडल्या नाहीत.' असं वक्तव्य करत सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानला टोमणा मारला.
तो पुढे म्हणाला, 'मला आशा आहे की वर्ल्डकपमध्ये देखील चांगला सामना होईल. आमच्या संघातील खेळडू पाकिस्तानविरूद्ध खेळण्यासाठी कायमच उत्सुक असतात.'
आशिया कपमधील ट्रॉफी वादाबाबत बोलायचं झालं तर आशिया कप होऊन अनेक महिने झाले तरी भारताला अजून विजेतेपदाची ट्रॉफी मिळालेली नाही.
सूर्यकुमार यादवला टी २० वर्ल्डकप २०२६ मधील संभाव्य फायनलबाबत देखील विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यानं त्वरित नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया हा अंतिम सामना होईल अशी शक्यता बोलून दाखवली.' भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं देखील ऑस्ट्रेलियाविरूद्ध फायनल खेळण्याबाबत वक्तव्य केलं होतं.
ती म्हणाली, 'आम्हाला ऑस्ट्रेलियाला पराभूत करायचं आहे. कारण हाच सामना तुमच्या कायम आठवणीत राहतो.'
ग्रुप A - भारत, युएसए, नाम्बिबिया, नेदरलँड्स, पाकिस्तान
ग्रुप B - ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्ललँड, ओमान
ग्रुप C - इंग्लंड, वेस्ट इंडीज, बांगलादेश, इटली, नेपाळ
ग्रुप D - दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, कॅनडा, युएई