Sunil Gavaskar |"२ वर्षांची बंदी पुरेशी नाही..." : IPL सोडणार्‍या खेळाडूंवर सुनील गावस्कर संतापले, BCCIकडे केली 'ही' मागणी

Sunil Gavaskar IPL reaction | बेन डकेट आयपीएलमधून माघार घेतल्याने दिल्लीच्या संघाचे नियोजन कोलमडले
सुनील गावस्कर
सुनील गावस्कर
Published on
Updated on

Sunil Gavaskar IPL reaction

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ च्या हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने आगामी हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला असून, त्याच्या या निर्णयावर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी खडेबोल सुनावले आहेत. शेवटच्या क्षणी माघार घेणाऱ्या विदेशी खेळाडूंवर बीसीसीआयने अधिक कठोर कारवाई करावी, अशी मागणी गावस्कर यांनी केली आहे.

बेन डकेटने 'या' कारणास्तव घेतली आयपीएलमधून माघार

दिल्ली कॅपिटल्सने लिलावात बेन डकेटला २ कोटी रुपयांना खरेदी केले होते. तो केएल राहुलसोबत डावाची सुरुवात करेल अशी अपेक्षा होती. आपल्या निर्णयाचे समर्थन करताना डकेट म्हणाला, "आयपीएलमधून माघार घेणे आणि मोठ्या रकमेवर पाणी सोडणे हा निर्णय सोपा नव्हता. जगातील सर्वोत्तम खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मी गमावत आहे, पण इंग्लंडसाठी खेळणे माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे सिद्ध करण्यासाठी मी हे पाऊल उचलले आहे." दरम्यान, इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी बेन डकेट याने आयपीएलमधून माघार घेतली असली तरी स्पर्धेला अवघे काही दिवस उरले असताना घेतलेल्या या निर्णयामुळे दिल्लीच्या नियोजनावर परिणाम झाला आहे.

सुनील गावस्कर
IPL 2026 : ३ कोटींचा अष्टपैलू IPL मधून बाहेर, सनरायझर्स हैदराबादला मोठा झटका

"२ वर्षांची बंदी पुरेशी नाही..."

'इंडिया टुडे'शी बोलताना गावस्कर म्हणाले, "आयपीएलमधून एखाद्या खेळाडूने माघार घेतली तर सध्या लागू असलेली दोन वर्षांची बंदी पुरेशी ठरत नाहीये, हे स्पष्ट आहे. बीसीसीआयने आता अशा काही ठोस उपाययोजनांचा विचार करायला हवा ज्याचा खेळाडूंवर खरोखर परिणाम होईल. जोपर्यंत खेळाडूच्या आयपीएलमधील पुनरागमन करण्याच्या संधीवर परिणाम होत नाही, तोपर्यंत असे नियम काम करणार नाहीत. डकेटला 'द हंड्रेड' स्पर्धेत चांगली किंमत मिळाल्यामुळे कदाचित त्याने आयपीएलपेक्षा इंग्लंडच्या कसोटी कारकिर्दीला प्राधान्य देणे सोयीचे मानले असावे, असेही गावस्कर यांनी स्पष्ट केले.

सुनील गावस्कर
BCCI on Abrar Ahmed : ‘आम्ही हस्तक्षेप का करू?’; पाकिस्तानी अबरार अहमदच्या निवडीवर बीसीसीआयची भूमिका स्पष्ट

काय आहे बीसीसीआयचा सध्याचा नियम?

'बीसीसीआय'च्या सध्याच्या नियमांनुसार, आयपीएल लिलावात खरेदी केल्यानंतर वैयक्तिक कारणास्तव शेवटच्या क्षणी माघार घेणाऱ्या विदेशी खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी घातली जाते. या काळात संबंधित खेळाडू आयपीएल किंवा लिलावात सहभागी होऊ शकत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news