

Sunil Gavaskar Temba Bavuma: दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बाऊमाने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात १७९ धावांची दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासोबतच दक्षिण अफ्रिकेने मालिकेत बरोबरी केली आहे. या खेळीनंतर बाऊमावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनिल गावसकर यांनी देखील बाऊमाची पाठ थोपटली आहे.
गावसकरांनी टेम्बा बाऊमा हा स्वतःला सर्वश्रेष्ठ सांगणारा व्यक्ती नाहीये. त्याच्याजवळ पीआर फौज नाहीये. गावसकरांनी बाऊमाची तुलना भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आणि गुंडाप्पा विश्वनाथ यांच्याशी केली.
सुनिल गावसकर मिड डे मध्ये लिहिलेल्या आपल्या स्तंभ लेखात म्हणतात, 'दक्षिण अफ्रिकेचा बाऊमा ज्यावेळी दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार झाला त्यावेळी त्याच्यावर कोटा सिस्टमसारखे नेहमीचे हलके फुलके आरोप लागले. मात्र एवढ्या वर्षात त्याने स्वतःला एक चांगला लीडर म्हणून सिद्ध केलं आहे. कर्णधार असणं अन् लीडर असणं वेगळं आहे. त्याने आपल्या कामगिरीने शंका व्यक्त करणाऱ्यांना तोंडघशी पाडले आहेत.
सुनिल गावसकर पुढे लिहितात, 'दक्षिण अफ्रिकेचे नेतृत्व करताना त्याने १४ कसोटी सामन्यात १२ सामने जिंकले आहेत. त्याने मालिकेतील पहिला कसोटी सामना फक्त हरला आहे. हे रेकॉर्ड अजिंक्य रहाणेच्या रेकॉर्डएवढे जबरदस्त आहे. रहाणेच्या नेतृत्वात भारताने कधी कसोटी सामना गमावलेला नाही. दोघेही छाडी बडवणारे खेळाडू नाहीत किंवा त्यांच्याजवळ जगाला ते किती चांगले आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करणारी कोणती पीआरची फौज देखील नाही.
गावसकर यांनी बाऊमाची गुंडाप्पा विश्वनाथ यांच्याशी देखील तुलना केली. ते म्हणाले, 'बाऊमाचे मैदानावरील वागणे सर्वांना आवडणारे आहे. तो गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण करून देतो. त्यांनी टफ क्रिकेटर होण्यासाठी जगाला शिव्या देण्याची अन् राग व्यक्त करण्याची गरज नसते.'
दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरूद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. त्यानंतर पावसाच्या व्यत्यय आलेला दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेची अवस्था ६ बाद ११० धावा अशी झाली होती. त्यानंतर टेम्बा बाऊमाने मार्को येनसेनच्या आणि सायमन हार्मरच्या साथीने भागीदारी रचत संघाला ४२० धावांपर्यंत पोहचवलं.
ऑस्ट्रेलियाला दोन्ही डावात मिळून हे टार्गेट पूर्ण करता आलं नाही. दक्षिण अफ्रिकेने एक डाव आणि ३१ धावांनी हा सामना जिंकला. आता मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली असून तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे.