स्टीव्ह स्मिथ @ 10,000..! जगातील दिग्‍गज फलंदाजांच्‍या यादीत मिळवले स्‍थान

Australia vs Sri lanka : ११५ व्या कसोटी सामन्यात गाठला १० हजार धावांचा टप्‍पा
australia vs sri lanka
australia vs sri lanka : ऑस्‍ट्रेलिया क्रिकेट संघातील स्‍टार फलंदाज स्‍टीव्‍ह स्‍मिथ.File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ऑस्‍ट्रेलियाचा स्‍टार फलंदाज स्‍टीव्‍ह स्‍मिथ याने आज (दि.२९) आपल्‍या नावावर आणखी एक विक्रमी कामगिरीची नोंद केली. (Australia vs Sri lanka) श्रीलंका विरुद्धच्‍या कसोटी मालिकेतील पहिल्‍या सामन्यात त्‍याने १०,००० कसोटी धावा पूर्ण केल्‍या. कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा टप्पा गाठणारा तो चौथा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे.

भारताविरुद्धच्या सामन्‍यात एक धाव कमी पडली...

सिडनी येथे भारताविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात स्‍टीव्‍ह स्‍मिथ बाद झाला. यावेळी त्‍याच्‍या नावावर ९९९९ धावा होत्‍या. याच सामन्‍यात त्‍याने १० हजार धावांचा टप्‍पा ओलांडला असता. मात्र यासाठी एक धाव कमी पडली होती. आज गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी त्‍याने १० हजार धावा पूर्ण केल्‍या. ११५ व्या कसोटी सामन्यात त्‍याने हा टप्पा गाठला आहे.

अशी कामगिरी करणारा जगातील १५ वा फलंदाज, चौथा ऑस्‍ट्रेलियन

३५ वर्षीय स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावा पूर्ण करणाऱ्या सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग आणि ब्रायन लारा सारख्या दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले आहे. कसोटी इतिहासात १०,००० धावा पूर्ण करणारा स्मिथ हा जगातील १५ वा फलंदाज ठरला आहे. स्मिथने ११५ कसोटी आणि २०५ डावांमध्ये ही कामगिरी केली. ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकाराने १९५ डावांमध्ये कसोटीत १०,००० धावा पूर्ण केल्या होत्‍या. सिडनीमध्ये १९९३ मध्‍ये ॲलन बॉर्डर यांनी तर २००३ मध्‍ये स्‍टीव्‍ह वॉ यांनी कसोटी क्रिकेटमध्‍ये दहा हजार धावांचा टप्‍पा पूर्ण केला होता. २००८ मध्ये अँटिग्वा येथे हा टप्पा गाठणारा रिकी पॉन्टिंग हा दुसरा ऑस्ट्रेलियन ठरला होता. स्मिथपूर्वी फक्त महेला जयवर्धने ९९९९ कसोटी धावांवर बाद झाला होता. १० हजार धावांचा टप्पा गाठणारा स्मिथ हा चौथा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे.

Pudhari

सर्वाधिक कसोटी शतके झळकविणारा दुसरा ऑस्ट्रेलियन फलंदाज

स्मिथने कसाेटी क्रिकेटचा पहिला सामना २०१० मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला. त्‍याच्‍या कारकीर्दीची सुरुवात समाधानकारक झाली नव्‍हती. त्याने दोन्ही डावांमध्ये एकत्रितपणे केवळ १३ धावा केल्या. तथापि, कालांतराने तो ऑस्ट्रेलियाच्या सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक बनला. ऑस्‍ट्रेलियाच्‍या मधल्या फळीतील दमदार फलंदाज म्हणून त्‍याने स्‍वत: ओळख निर्माण केली. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ३४ शतके आहेत आणि तो ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कसोटी शतकवीर आहे. त्याच्यापेक्षा अधिक शतके केवळ रिकी पॉन्टिंगनेच झकळावली आहेत. त्‍यांच्‍या नावावर कसोटीत ४१ शतके आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news