England vs Sri Lanka : तिसर्‍या कसोटीतही श्रीलंका 'बॅकफूट'वर

पहिल्‍या डावात अवघ्‍या ९३ धावांवर निम्‍मा संघ तंबूत
England vs Sri Lanka Update
विकेट घेतल्यानंतर जल्लोष करताना इंग्लिश खेळाडूECB X Handle
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंग्‍लंड विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेतील तिसर्‍या सामन्‍यातही श्रीलंका पुन्‍हा एकदा बॅकफूटवर केले आहे. इंग्‍लंडचा पहिला डाव 69.1 षटकात 325 धावांवर संपुष्‍टात आला. श्रीलंकेच्‍या फलंदाजांची हाराकिरी कायम राहिली. अवघ्‍या ९३ धावांवर निम्‍मा संघ तंबूत परतला आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने दोन सामने जिंकले आहेत. आता तिसरा सामना जिंकत श्रीलंकेचा व्‍हाईटवॉश करण्‍यासाठी संघ प्रयत्‍नशील आहे.

England vs Sri Lanka| इंग्‍लंडचा पहिला डाव ३२५ धावांवर आटोपला

मालिकेतील तिसरा आणि शेवटच्‍या सामना 6 सप्टेंबरपासून लंडनमधील केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर सुरु आहे. श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडच्या संघाने 44.1 षटकांत तीन गडी गमावून 221 धावांपर्यंत मजल मारली होती. दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी ४५ धावा गेली. कर्णधार ओली पोपने दोन षटकार आणि 19 चौकार फटकावत 154 धावांची सर्वोत्तम खेळी केली. ऑली पोपशिवाय बेन डकेटने 86 धावा केल्या. श्रीलंकेकडून मिलन प्रियनाथ रथनायकेने सर्वाधिक तीन बळी घेतले.पहिल्या डावात इंग्लंडचा संपूर्ण संघ 69.1 षटकात 325 धावा करत सर्वबाद झाला. मिलन व्यतिरिक्त प्रियनाथ रथनायके, लाहिरू कुमारा, विश्व फर्नांडो आणि कर्णधार धनंजय डी सिल्वा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

तिसर्‍या कसोटीतही श्रीलंकेची खराब सुरुवात, ९३ धावांवर निम्‍मा संघ तंबुत

तिसर्‍या कसोटीच्‍या पहिल्‍या डावात श्रीलंकेच्‍या फलंदाजांची हाराकिरी कायम राहिली. अवघ्‍या ९३ धावांवर निम्‍मा संघ तंबूत परतला आहे. श्रीलंकेकडून पहिल्या डावाची सुरुवात करताना सलामी फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. यावेळी पथुम निसंक्का याने 51 चेंडूचा सामना करत जलदगतीने 61 धावा कुटल्या. पण याच्याशिवाय कोणालाही मैदानावर पाय जमवता आलेले नाही. श्रीलंकेची पहिली जोडी 34 धावांवर ओली स्टोन याने करुनारत्ने याला 9 धावांवर धावचीत बाद करत फोडली. यानंतर ख्रिस वोक्स याने मेंडिसला 14 धावांवर बाद करत परतीचा रस्ता दाखवला. तसेच ओली स्टोन याने मॅथ्युस आणि चंडीमल यांना बाद करत श्रीलंकेला डबल धक्के दिले. सध्या कमिंडू मेंडिस आणि धनंजय डीसिल्वा मैदानावर आहेत. दुसऱ्या दिवसाच्या चहाच्या विश्रांतीपर्यंत श्रीलंकेची धावसंख्या 5 बाद 148 धावा झालेली आहे. तर डावामध्ये बढतीसाठी लंकेच्या खेळाडूंना 183 धावांचा पाठलाग करायचा आहे.

England vs Sri Lanka| इंग्‍लंड मालिकेत २-0ने आघाडीवर

दुसऱ्या कसोटीत इंग्लंड संघाने श्रीलंकेचा 190 धावांनी पराभव केला. यासह इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना जिंकत श्रीलंकेला व्‍हाईटवॉश देण्‍यासाठी इंग्‍लंडचा संघ प्रयत्‍नशील आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news