श्रीलंकेचा न्‍यूझीलंडला धक्‍का! WTC गुणतालिकेत मारली मुसंडी

SL vs NZ Test : सामन्‍यातील अखेरच्‍या दिवशी प्रभातच्‍या 'फिरकी'ची कमाल
Sri Lanka VS New Zealand Test
गॅले कसोटी सामन्‍यात श्रीलंकेने न्‍यूझीलंडचा ६३ धावांनी पराभव करत मालिकेत १-0 अशी आघाडी घेतली आहे. X (Twitter)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गॅले येथील कसोटी सामन्‍यात श्रीलंकेने न्‍यूझीलंडचा ६३ धावांनी पराभव करत मालिकेत १-0 अशी आघाडी घेतली आहे. सामन्‍याच्‍या अखेरच्‍या दिवशी फिरकीपटू प्रभात जयसूर्याने न्‍यूझीलंडचा निम्‍मा संघ तंबूत धाडत श्रीलंकेच्‍या विजयात निर्णायक भूमिका बजावली. दरम्‍यान, या पराभवामुळे न्‍यूझीलंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या गुणतालिक फटका बसला आहे तर श्रीलंकेने मुसंडी मारली आहे. (Sri Lanka VS New Zealand Test)

सामन्‍यात काय घडलं?

दोन सामन्‍यांच्‍या कसोटी मालिकेतील गॅले येथे झालेल्‍या पहिल्‍या सामन्‍यात श्रीलंकेने टॉस जिंकला. कर्णधार धनंजय डी सिल्‍वाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कामिंडू मेंडिसच्‍या (११४ धावा) शतकी खेळी आणि अँजेलो मॅथ्यूजने 36 आणि दिनेश चंडिमलने 30 धावांच्‍या योगदानाने श्रीलंकेने पहिल्‍या डावात ३०५ धावांपर्यंत मजल मारली. यानंतर न्यूझीलंडच्‍या पहिल्‍या डावात टॉम लॅथमच्या याने 70 धावांची खेळी केली. तर डॅरिल मिशेल (57) आणि केन विल्यमसन (55) यांनी अर्धशतके झळकावत पहिल्‍या डावात ३४० धावांपर्यंत मजल मारत ३५ धावांची आघाडी घेतली होती.

न्यूझीलंडला विजयासाठी २७५ धावांचे लक्ष्य

श्रीलंकेच्‍या दुसर्‍या डावात दिमुथ करुणारत्ने याने ८३ धावा केल्‍या. संघाने ३०९ धावांपर्यंत मजल मारत न्यूझीलंडला विजयासाठी २७५ धावांचे लक्ष्य दिले होते.

श्रीलंकेच्‍या प्रभात जयसूर्या पडला रचिन रवींद्रवर भारी

२७५ धावांच्‍या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव सुरुवातीपासूनच डळमळीत दिसत होता. एकामागून एक विकेट पडत राहिल्या. मात्र युवा अष्टपैलू रचिन रवींद्र (९२) याने न्‍यूझीलंडच्‍या विजयाच्‍या आशा जिंवत ठेवल्‍या होत्‍या. रविवारी चौथ्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्‍हा न्‍यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी ६८ धावांची गरज होती. मात्र केवळ दोनच विकेट्स शिल्लक होत्या. रचिन रवींद्र क्रीजवर असल्याने न्यूझीलंडचा विजय अपेक्षित होता. मात्र श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी रचिनला एलबीडब्ल्यू आऊट करून न्यूझीलंडला मोठा धक्का दिला. न्यूझीलंडचा दुसरा डाव २११ धावांवर आटोपला. प्रभात जयसूर्या याने पहिला डावात १३६ धवा देत ४ तर दुसर्‍या डावात ६८ धावा देत ५ विकेट घेतल्‍या. त्‍यालाच सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

दुसर्‍या डावात न्‍यूझीलंडचा संघ २११ धावांवर बाद

आज सामन्‍याच्‍या सुरुवात होताच. न्‍यूझीलंडच्‍या उर्वरित दोन्‍ही विकेट श्रीलंकेला 15 मिनिटांपेक्षा कमी अवधीत मिळाला. दुसर्‍या डावात न्‍यूझीलंडचा संघ २११ धावांवर बाद झाला. या डावात न्‍यूझीलंडसाठी रचिन रवींद्रने सर्वाधिक 92 धावा केल्या. तर प्रभात जयसूर्या संपूर्ण सामन्यात नऊ विकेट्स घेतल्या. त्याने विल्यम ओ'रूर्कला शून्यावर बाद करून सामना संपवला. डावखुरा फिरकी गोलंदाज एजाज पटेलने श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात ९० धावा देत ६ विकेट घेतल्‍या हाेत्‍या. यापूर्वी १९९८ मध्ये डॅनियल व्हिटोरीने कोलंबो कसाेटीत ६४ धावांवर ६ विकेट घेतल्‍या हाेत्‍या. यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजाने केलेली सर्वोत्तम आकडेवारी ठग़ली आहे. आता मालिकेतील दुसरा सामना गुरुवारपासून खेळवण्‍यात येणार आहे.

WTC गुणतालिकेत श्रीलंकेची मुसंडी

आजच्‍या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या गुणतालिकेत श्रीलंकेने मुसंडी मारली आहे. न्‍यूझीलंडने श्रीलंकेला पिछाडवर टाकले आहे. यंदा आठ सामन्यांत ४ विजय आणि ४ पराभवानंतर श्रीलंकेचे ४८ गुण झाले आहेत. ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानावर असून, श्रीलंकेचा संघ तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. न्‍यूझीलंड संघ तिसर्‍या स्‍थानावरुन चौथ्‍या स्‍थानावर फेकला गेला आहे. नुकताच बांगलादेश विरुद्‍धचा कसाेटी सामना जिंकल्‍याने WTC गुणतालिकेत भारताचे अग्रस्‍थान कायम आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news