
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चार सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज (दि.१०) सेंट जॉर्ज पार्क येथील मैदानावर होत आहे. ६१ धावांनी पहिला सामना जिंकत भारताने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला होता. हा सामनातही वरुण चक्रवर्ती व रवी बिष्णोई हे फिरकीपटू करिश्मा दाखवून सामना आपल्या बाजूने वळवतील का? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. या सामन्यात संघात कोणताही बदल केलेला नाही. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण आफ्रिका आणि भारतामध्ये टी-२० चा पहिला सामना किंग्जमीड येथे झाला होता. या सामन्यात भारताने आफ्रिकेसमोर 203 धावांचे आव्हान भारताने ठेवले होते. हे आव्हान पूर्ण करताना साऊथ आफ्रिकन फलंदाजांची पुरती दमछाक झाली. भारताच्या वरुण चक्रवर्ती व रवी बिष्णोई या दोन फिरकीपटूंनी लागोपाट बळी घेत दक्षिण अफ्रिकेचा डाव १४१ धावात गुंडाळत आफ्रिकेचा धुव्वा उडवला होता. आफ्रिकेला ६१ धावात चितपट केले होते. आता या सामन्याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.