

इंदूर : भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना लवकरच इंदूरची सून होणार असल्याचा दावा संगीत दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता पलाश मुच्छल यांनी केला असून त्यांच्या या वक्तव्यामुळे या स्टार फलंदाजासोबतच्या त्याच्या नात्याबद्दलच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे.
मुच्छल आणि मानधना यांच्यातील नात्याबद्दल माध्यमांमध्ये बर्याच काळापासून चर्चा सुरू असून, सोशल मीडियावर शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये हे दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. मात्र, या दोघांनी आपण नात्यात असल्याचा कधीही सार्वजनिकरीत्या दुजोरा दिलेला नाही. शुक्रवारी स्टेट प्रेस क्लब येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान, मुच्छलला त्याच्या नात्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर तो पत्रकारांना म्हणाला, ती लवकरच इंदूरची सून होणार आहे... मला एवढेच सांगायचे आहे.