

नवी दिल्ली : आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी मायकेल क्लार्कच्या शोमध्ये 2008 मधील प्रसिद्ध ‘स्लॅपगेट’ घटनेचा व्हिडीओ पुन्हा प्रसिद्ध केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या व्हिडीओमध्ये हरभजन सिंग श्रीसंतच्या कानाखाली मारताना दिसत आहे.
या प्रकारावर श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरी कुमारी प्रचंड संतापली आहे. तिने इन्स्टाग्रामवर मोदी आणि क्लार्कवर टीका करत म्हटले, तुम्हाला लाज वाटायला हवी. हरभजन आणि श्रीसंत दोघेही 17 वर्षे जुना वाद विसरून पुढे गेले आहेत. त्यांची मुले आता शाळेत जातात. केवळ लोकप्रियतेसाठी जुन्या जखमांवर मीठ चोळणे हे अत्यंत निर्दयी आणि अमानवीय आहे.