Shakira : फिफाच्या अधिकृत ‘दाई दाई’ गाण्यात शकीराचा जलवा, डान्स मूव्ह्सवर चाहते फिदा (Video)

पॉप स्टार Shakira हिने शनिवारी फिफा 2026 च्या अधिकृत गाण्याचा व्हिडिओ रिलीज केला.
Shakira Dance Video
Shakira : फिफाच्या अधिकृत ‘दाई दाई’ गाण्याच्या व्हिडिओमध्ये शकीराचा जलवा, डान्स मूव्ह्सवर चाहते फिदा (Video)file photo
Published on
Updated on

shakira dance in video of fifa official song dai dai fans praise her 2026

FIFA Official Song Dai Dai Video : पॉप स्टार Shakira हिने शनिवारी फिफा 2026 च्या अधिकृत गाण्याचा व्हिडिओ रिलीज केला. या व्हिडिओमध्ये अनेक दिग्गज फुटबॉलपटू देखील दिसून आले. शकीराने या गाण्यात जबरदस्त डान्स सादर केला असून तिच्या डान्स मूव्ह्सवर चाहते अक्षरशः फिदा झाले आहेत.

Shakira Dance Video
FIFA World Cup 2026 : इराणने फिफाला झुकवले! अमेरिकेतील सराव तळ हलवून मेक्सिकोत गाडले तंबू

फिफाच्या अधिकृत ‘दाई दाई’ गाण्यातील शकीराचे डान्स स्टेप्स पाहून चाहते प्रचंड उत्साहित झाले असून सोशल मीडियावर तिचे भरभरून कौतुक केले जात आहे. शकीराने शनिवारी उशिरा रात्री हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला होता. अवघ्या 10 तासांत या व्हिडिओला 1 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले.

या व्हिडिओमध्ये फुटबॉलच्या रोमांचक सामन्यांची झलक दाखवण्यात आली आहे, ज्यामध्ये Lionel Messi, Kylian Mbappé आणि Cristiano Ronaldo यांसारखे सुपरस्टार सहभागी होणार आहेत.

Shakira Dance Video
FIFA World Cup 2026 Explainer: खास 'ट्रायोंडा' बॉलपासून तिकीटाचे दर, वेळापत्रक अन् ब्रॉडकास्टर; फिफा वर्ल्डकपची A टू Z माहिती

मियामीमध्ये शूट झाले गाणे

चार मिनिटांच्या या व्हिडिओची सुरुवात Lionel Messi, Kylian Mbappé आणि Erling Haaland यांसारख्या फुटबॉल स्टार्सच्या मैदानात उतरण्याने होते. हे सर्वजण फिफासाठी सज्ज असल्याचे जाहीर करतात. त्यानंतर गाण्यात शकीराची दमदार एन्ट्री होते.

हे गाणे Miami येथे शूट करण्यात आले आहे. या व्हिडिओचे दिग्दर्शन Hannah Lux Davis यांनी केले आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला शकीरा Angel of Independence या प्रसिद्ध स्मारकाच्या टोकावर उभी दिसते. त्यानंतर ती फुटबॉल स्टेडियममध्ये डान्सर्ससोबत जबरदस्त डान्स करताना दिसते.

दिग्गज फुटबॉलपटूंना शकीराचा ट्रिब्यूट

व्हिडिओच्या शेवटी मागील वर्ल्ड कप सामन्यांचे काही जुने क्लिप्सही दाखवण्यात आले आहेत. यावेळी शकीरा महान फुटबॉलपटू Diego Maradona, Paolo Maldini, Romário, Cristiano Ronaldo, David Beckham, Kaká आणि Lionel Messi यांची नावे घेत त्यांना ट्रिब्यूट देते. तसेच या वर्षी वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणाऱ्या Brazil, Argentina, Colombia, United States आणि Netherlands यांचाही उल्लेख गाण्यात करण्यात आला आहे.

वर्ल्ड कप फायनलमध्ये शकीराचा परफॉर्मन्स

Shakira 19 जुलै रोजी New Jersey मधील स्टेडियममध्ये होणाऱ्या फिफा वर्ल्ड कप फायनलच्या हाफटाइम शोमध्ये सादरीकरण करणार आहे. तिच्यासोबत Madonna आणि BTS या कोरियन म्युझिक ग्रुपची परफॉर्मन्सही चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. FIFA World Cup 2026 चे आयोजन 11 जून ते 19 जुलै 2026 या कालावधीत करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news