चेन्नई : पुढारी ऑनलाईन
आयपीएल २०२१ च्या हंगामासाठी काल (गुरुवारी) लिलाव झाला. यंदाच्या आयपीएल लिलावात सर्वांच्या नजरा सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरवर होत्या. या स्टार किडवर बेस प्राईस २० लाख होती. तेवढ्याच किंमतीमध्ये मुंबई इंडियन्सने त्याला खरेदी केले.
वाचा : पुणे : 'नॉन स्ट्राईक'वर उभ्या असलेल्या फलंदाजाचा हृदयविकाराने मृत्यू
या लिलावादरम्यान ट्विटरवर अर्जुन तेंडुलकर टॉप ट्रेडवर होता. तो नेमका का ट्रेंडवर का आहे? हे कोणाच्याही सुरुवातीला लक्षात आले नाही. मात्र, संबंधित टॅगवर क्लिक केल्यावर चित्र समोर आले. याचे कारण होते सचिन बेबी. केरळचा ३२ वर्षीय खेळाडू सचिन बेबीला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने २० लाखांच्या बेस प्राइजवर खेरदी केले. मात्र, नेटकऱ्यांनी सचिन बेबीला सचिन तेंडुलकरचा मुलगा समजले. यावरुन ट्विटरवर मीम्स आणि जोक्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
वाचा : सचिनच्या अर्जुनसाठी फक्त मुंबईचाच हात वर; इतरांनी पाठ फिरवली!
'अर्जुन तेंडुलकरवर जास्त खर्च करण्याऐवजी आरसीबीने सचिन बेबीला मिळवले. यंदाच्या हंगामात दोन सचिन बेबी होते. आरसीबीने चुकीने सचिन बेबीला खरेदी केले.' अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ट्विटरवर युजर्सकडून व्यक्त झाल्या.
मुंबई इंडियन्स सोडता इतर कोणत्याही संघाने अर्जुन तेंडुलकर याच्यासाठी रस दाखवला नाही. मुंबईकडून झहीर खानने अर्जुनसाठी हात वर केला. इतर कोणत्याही संघाने त्याच्यासाठी बोली लावली नाही.
दरम्यान, विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने सचिन बेबी क्रिकेटरला बेस प्राईसमध्ये खरेदी केले आहे. सचिन बेबीला २० लाखांत खरेदी केले.
वाचा : IPL auction 2021 : आयपीएल लिलावाची सांगता अर्जुन तेंडुलकरने
यंदाच्या आयपीएल लिलावात भारत आणि विदेशातील असे मिळून २९२ खेळाडू सहभागी झाले आहेत. आयपीएलच्या इतिहासात सर्वांत महागडा खेळाडू दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस ठरला. त्याला १६.२५ कोटी रुपयांना राजस्थान रॉयल्सने खरेदी केले. त्यानंतर पंजाबच्या ग्लेन मॅक्सवेलला विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने तब्बल १४.२५ कोटीला खरेदी केले.