Commonwealth Game 2026: मजुरीपासून मेडलपर्यंतचा प्रवास... कधी २०० रू. साठी तरसणाऱ्या ऋषिकेशनं खोवला शिरपेचात मानाचा तुरा

Commonwealth Game 2026
Commonwealth Game 2026pudhari
Published on
Updated on

Commonwealth Game 2026: मजुरी करून आपल्या कुटुंबांच्या आशा अकांशांचे ओझे वाहणाऱ्या ऋषिकांत सिंहने राष्ट्रकुल स्पर्धेत मोठा धमाका केला आहे. त्याने भारतासाठी वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकलं आहे. पुरूषांच्या ६० किलो वजनी गटात ऋषिकेशने पदकाची कमाई केली. त्याने एकूण २६४ किलो वजन उचललं. त्या त्याने स्नॅचमध्ये १२१ किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये १४३ किलो वजन उचललं. शेवटच्या प्रयत्नात त्याला १५१ किलो वजन उचलता आलं नाही. त्यामुळं त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. आज ऋषिकांच्या नावाचा जयघोष असला तरी कधी काळी त्याला २०० रूपये कमवण्यासाठी मोल मजुरी करावी लागली होती.

Commonwealth Game 2026
Commonwealth Games 2026 : नीरज चोप्रा दुसऱ्या सुवर्णपदकासाठी सज्ज, ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम-पाथिरागेचे तगडे आव्हान

आर्थिक परिस्थितीमुळं सोडावा लागला खेळ

ऋषिकांतने एका मुलाखतीत सांगितलं की एक काळ असा होती की त्याला वाटत होतं की त्याचे वेटलिफ्टिंगमधील करिअर संपुष्टात आलं आहे. त्याने खेळाशी निगडीत असलेल्या आपल्या मित्रांसोबतचा संपर्क देखील कमी केली होता. त्याला फक्त उद्याचं काम कसं मिळणार याची चिंता होती. त्या काळात ऋषिंकात फक्त १५० ते २०० रूपयांसाठी मजुरी करत होता. कुटुंब चालवणे आणि त्याचा डाएट सांभाळणे खूप अवघड झालं होतं.

अनेकवेळा त्याला उपाशी रहावं लागलं होतं. त्याला दूध अन् अंडी खरेदी करणे देखील जमत नव्हतं. घरातील जेवणावरच त्याला काम भागवावं लागत होतं. आर्थिक कारणांमुळं त्याला आपला खेळ काही काळ सोडावा लागला होता.

Commonwealth Game 2026
Commonwealth Games 2026 : ग्लासगोत ऋषिकांत सिंहची रौप्यपदकाला गवसणी; राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला दुसरे पदक

स्टेर ऑफ एक्सिलेन्सनं आयुष्य बदललं

ऋषिकांत याचे ताक्येल येथील वेटलिफ्टिंग सेंटर ऑफ एक्सिलेन्समध्ये सराव करण्याची संधी मिळाली त्यावेळी नशीब बदलले. इथं आल्यावर त्याने पुन्हा मेहनत केली. एका वर्षाच्या आत त्याने वरिष्ठ स्तरावरील खिताब जिंकला. त्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडण्यास सुरूवात केली. २०२५ मध्ये अहमदाबादमध्ये आयोजित राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पुरूषांच्या ६० किलो वजनी गटात त्याने सुवर्ण पदक जिंकलं.

Commonwealth Game 2026
commonwealth games 2026 : उद्घाटनाआधीच धमाका! भारताचे पहिले पदक निश्चित! ; जाणून घ्या कसं घडलं हे 'सरप्राइज'!

यशाचं श्रेय कोचला

राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घालण्याचे स्वप्न जर भंगले असले तरी रौप्य पदक जिंकल्यानंतर ऋषिकांत खूप खुश दिसला. त्याने आपल्या यशाचे श्रेय हे विजय शर्मा यांना दिलं. तो म्हणाला की, 'कोच विजय शर्मा यांनी ट्रेनिंगवेळी आणि स्पर्धेवेळी खूप काही शिकवलं. त्यांना त्यांच्या तयारीवर पूर्ण विश्वास होता. ऋषिकांतची स्टोरी ही ज्यांना आयुष्यात काहीतरी मिळवायचं आहे त्यांच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news