जडेजानेही जाहीर केली T20 क्रिकेटमधून निवृत्ती

विराट काेहली-रोहित शर्मा पाठाेपाठ T20 क्रिकेटला अलविदा
Ravindra Jadeja
रवींद्र जडेजा यानेही टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. Twitter

टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत विश्‍वचषकावर आपलं नाव कोरलं. तब्‍बल ११ वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्‍काळ संपवला. या विजयानंतर टीम इंडियाच कर्णधार रोहित शर्मा आणि स्‍टार फलंदाज विराट कोहली या दोघांनीही T-20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यानंतर आज भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यानेही टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंस्टाग्राम पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली.

T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे एक स्वप्न पूर्ण

इंस्टाग्राम पोस्‍टमध्‍ये जडेजाने लिहिले आहे की, "माझ्या मनापासून, मी T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांना अलविदा म्हणतो. मी माझ्या देशासाठी नेहमीच माझे सर्वोत्तम दिले आहे आणि इतर फॉरमॅटमध्येही असेच करत राहीन. T20 विश्वचषक जिंकून माझ्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे एक स्वप्न पूर्ण झाले, आठवणी, उत्साह आणि अतुलनीय पाठिंबा यासाठी धन्यवाद.

Ravindra Jadeja
रवींद्र जडेजा यानेही टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. Twitter

जडेजाची T20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द

रवींद्र जडेजाने २००९ मध्ये भारताकडून T20 क्रिकेटमध्‍ये पदार्पण केले होते. या फॉरमॅटमध्ये त्‍याने एकूण ७४ सामने खेळले आहेत. यामध्ये त्‍याने १२७.१६ च्या स्ट्राइक रेटने ५१५ धावा केल्या आणि ५४ बळी घेतले. 2009 ते 2024 या कालावधीत टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. विश्‍वचषक स्‍पर्धांमध्‍ये त्‍याने एकूण 30 सामने खेळले. यामध्ये त्‍याने १३० धावा केल्या आणि २२ बळी घेतले. त्याचबरोबर आशिया कपमध्ये सहा सामने खेळले. यामध्ये त्याने दोन डावात ३५ धावा केल्या. यंदाच्‍या T20 विश्वचषक 2024 मध्ये रवींद्र जडेजाला चमकदार कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेत त्याने एकूण आठ सामने खेळले आणि केवळ 35 धावा केल्या. तसेच केवळ एक विकेट मिळाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news