'अश्विन'चा पुणे कसोटीत धमाका! 'कांगारुं'च्या 'लायन'ला मागे टाकत रचला इतिहास

Ravichandran Ashwin | बनला कसोटी इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा ७वा गोलंदाज
Ravichandran Ashwin, India vs New Zealand 2nd Test
पुणे- न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या कसोटीत पहिल्याच षटकात अश्विनने न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमला बाद केले.(BCCI)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने आज गुरुवारी (दि.२४) इतिहास रचला. आर अश्विन ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नॅथन लायन याला मागे टाकून कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा सातवा गोलंदाज ठरला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात (IND vs NZ 2nd Test) ३८ वर्षीय अश्विनने तीन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या.

अश्विनला आज नॅथन लायनच्या ५३० विकेट्सचा टप्पा पार करण्यासाठी तीन विकेट्सची गरज होती. हा टप्पा त्याने आश्चर्यकारक पद्धतीने गाठला. त्याने पहिल्याच षटकात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमला १५ धावांवर बाद केले. त्यानंतर अश्विनने विल यंगला १८ धावांवर यष्टिरक्षक ऋषभ पंत करवी झेलबाद करुन भारताला आणखी एक यश मिळवून दिले. त्याने तिसरी विकेट डेव्हन कॉनवेची घेतली. कॉनवेने ७६ धावांची खेळी केली. तो पंत करवी झेलबाद झाला.

अश्विनच्या एकूण ५३१ विकेट्स पूर्ण

आजच्या महत्वपूर्ण ३ विकेट्ससह अश्विनने एकूण ५३१ विकेट्स पूर्ण केल्या आहेत. यामुळे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५३० विकेट्स घेणाऱ्या नॅथन लायन मागे टाकले आहे. या कामगिरीने अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा सातवा गोलंदाज बनला आहे.

या यादीत श्रीलंकेचा दिग्गज माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन ८०० विकेट्सह अव्वल स्थानी आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न (७०८ विकेट्स), इंग्लंडचा जेम्स अँडरसन (७०४ विकेट्स), भारताचा अनिल कुंबळे (६१९), इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड (६०४ विकेट्स) आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा (५६३ विकेट्स) यांचा क्रमांक लागतो.

Summary

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

  • मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)- ८००

  • शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) - ७०८

  • जेम्स अँडरसन (इंग्लंड) - ७०४

  • अनिल कुंबळे (भारत) -६१९

  • स्टुअर्ट ब्रॉड ( इंग्लंड) - ६०४

  • ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया)- ५६३

  • रविचंद्रन अश्विन ( भारत) - ५३१

  • नॅथन लायन (ऑस्ट्रेलिया)- ५३०

Ravichandran Ashwin, India vs New Zealand 2nd Test
IND vs NZ Test : पहिल्या दिवसाचा खेळ संपला, भारत 243 धावांनी पिछाडीवर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news