

पुढारी ऑनलाईन डेस्क : रमणदीप सिंगने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. या सामन्यात 7व्या क्रमांकावर तो फलंदाजीसाठी आला होता. या सामन्यातील त्याने पहिल्या चेंडूवर त्याने आपल्या नावार एक विक्रमाची नोंद केली. अशी कामगिरी करणारा जगातील आठवा आणि भारतातील दुसरा फलंदाज बनला आहे.
रमनदीपने आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिल्याच चेंडूवर गगनचुंबी षटकार ठोकला. या षटकाराच्या जोरावर दिग्गज टी-20 फलंदाजांच्या यादीमध्ये त्याने स्थान मिळवले. तसेच अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू बनला आहे. यापूर्वी भारताचा टी-20संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फलंदाजीचा प्रारंभ षटकार ठोकून केला होता.
सोहेल तनवीर (पाकिस्तान)
जेरोम टेलर (वेस्ट इंडिज)
झेवियर मार्शल ( वेस्ट इंडिज)
कायरॉन पोलार्ड (वेस्ट इंडिज)
टिनो बेस्ट (वेस्ट इंडिज)
मांगलिसो मोसेले (दक्षिण आफ्रिका)
सूर्यकुमार यादव (भारत)
रमणदीप सिंग (भारत)