Rahul Dravid
विश्‍वचषक विजयानंतर टीम इंडियाचे मुख्‍य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफबराेबर संवाद साधला.Twitter

"...असे क्षण " : 'निरोपा'च्‍या भाषणावेळी राहुल द्रविड झाले भावूक

विश्वचषक विजयानंतर खेळाडूंबरोबर साधला संवाद
Published on

टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत विश्‍वचषकावर आपलं नाव कोरलं. तब्‍बल ११ वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्‍काळ संपवला. टीम इंडियाचे मुख्‍य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्‍यासाठी हा विजय खास होता. कारण या स्‍पर्धेनंतर ते प्रशिक्षक पदावरुन पायउतार होणार आहेत. टीम इंडियाच्‍या खेळाडूंनी उत्‍कृष्‍ट खेळीचे प्रदर्शन करत द्रविड यांना विश्‍वचषकाची स्‍मरणीय भेट दिली आहे. विश्‍वचषक विजयानंतर प्रशिक्षक म्‍हणून निरोप घेतला राहुल द्रविड भावूक झाले होते. या निरोपाच्‍या भाषणाचा व्‍हिडिओ BCCIने शेअर केला आहे.

राहुल द्रविड यांनी भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्‍हणून नोव्‍हेंबर २०२१ मध्‍ये पदभार स्‍वीकारला होता. त्‍याच्‍या कार्यकाळात टीम इंडियाने अनेक सामन्‍यात विजय मिळवले. कसोटी आणि वन-डे विश्‍वचषकाच्‍या अंतिम सामन्‍यातही संघाने धडक मारली. मात्र ICCव्‍या या दोन्‍ही स्‍पर्धांतील जेतेपदापासून हुलकावणी मिळाली. त्‍यामुळे टी20 विश्‍वचषक स्‍पर्धेतील जेतेपद खास ठरले. प्रशिक्षकपदातून कार्यमुक्‍त होण्‍यापूर्वी त्‍यांच्‍यासाठी हा गौरवाचा क्षण ठरला.

माझ्‍याकडे शब्‍दच नाहीत

या वेळी राहुल द्रविड म्‍हणाले की, संघाला निरोप देताना माझ्‍याकडे शब्‍दच नाहीत. मला एवढेच सांगायचे आहे की, तुम्‍ही टी20 विश्‍वचषक जिंकून मला एक अविश्‍वसनीय स्‍मरणशक्‍तीचा क्षण दिला आहे. हा क्षण वारंवार आठवेल. तुम्हाला तुमची कारकीर्द आठवणार नाही; पण असे क्षण तुम्हाला कायम आठवतील.”

गेल्‍या काही वर्षांमध्‍ये निराश करणारेही क्षण आले...

गेल्‍या काही वर्षांमध्‍ये निराक्षेचेही क्षण आहे. आम्‍ही विजेतेपदाच्‍या जवळ गेलो होतो;पण आम्‍हाला जेतेपदाने हुलकावणी दिली. या कामगिरीसाठी आमच्‍या खेळाडूंनी आणि सपोर्ट स्टाफने दिलेल्‍या योगदानाचे संपूर्ण देशाला अभिमान आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने त्याग केला आहे. आज तुमचे कुटुंबीय तुमची वाट पाहत आहेत. या क्षणाचा आनंद घेण्यासाठी तुमच्यासाठी अनेक लोकांनी खूप त्याग केला आहे, असेही द्रविड यांनी नमूद केले.

रोहित खूप खूप धन्यवाद...

तुमच्यापैकी प्रत्येकासोबत प्रशिक्षणाचा काळ व्‍यतित करणे हा एक आनंद होता. रोहित शर्मा याने माझ्‍याशी नोव्‍हेंबर २०२३ मध्‍ये फोनवर चर्चा केली. आपल्‍याला पुढे वाटचाल करायची असल्‍याचे त्‍याने सांगितले. त्‍याने मला दिलेल्‍या प्रोत्‍साहानाबद्‍दल मी त्‍याचे आभार मानतो. रोहित खूप खूप धन्यवाद. कर्णधार आणि प्रशिक्षक या नात्याने अनेक चर्चा होतात. प्रत्‍येक मुद्‍यावर तुमचे सहमती होईलच असे नाही. तरीही सर्वांनी एकत्र येवून केलेली कामगिरी ही स्‍मरणीय ठरली, असेही द्रविड यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news