

वन-डे विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेटपटूंनी केलेल कमबॅक सर्वांनाच सुखद धक्का देणारे ठरलं. यानंतर आता भारतीय पुरुष क्रिकेट आणि महिला क्रिकेट संघाची तुलनाही होवू लागली आहे.
Women's World Cup : भारतीय महिला क्रिकेट संघाटने ऐतिहासिक कामगिरी करत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. या स्पर्धेत सलग तीन सामन्यांमध्ये पराभव झालेल्या भारतीय महिला क्रिकेटपटूंनी केलेल कमबॅक सर्वांनाच सुखद धक्का देणारे ठरलं. यानंतर आता भारतीय पुरुष क्रिकेट आणि महिला क्रिकेट संघाची तुलनाही होवू लागली आहे. अशीच तुलना करत भारताचा माजी फिरकीपटू आर. अश्विनने महिला क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
आपल्या यूट्यूब चॅनलवर अश्विन म्हणाला की, भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला. यानंतर संघाने संघाची माजी कर्णधार मिताली राज हिला दिला. या कृतीसाठी मी संघाला सलाम करतो. भारतीय पुरुष संघाने असं काही कधीच केलं नाही. माध्यमांसमोर आपण अनेकदा काही गोष्टी बोलतो; पण मागील पिढीच्या योगदानाचं खरं श्रेय देताना फार कमी लोक दिसतात. आमचा संघ जास्त चांगला, तुमचा नाही, अशी चर्चाही झडत राहतात. पण भारतीय महिला खेळाडूंनी माजी मिताली राज, अंजुम चोप्रा यांसारख्या ज्येष्ठ खेळाडूंना ट्रॉफी देऊन त्यांनी हे दाखवून दिलं की त्यांच्या कष्टांची फळं आज विजयानं उमलली आहेत. हे पाहून मला अविश्वसनीय आनंद झाला. कारण हा विजय आजचाच नाही – तो गेल्या २५-३० वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम आहे. कर्णधाराला ट्रॉफी देत माजी खेळाडूंचा आदर कसा करावा याचे सुंदर उदाहरण महिला क्रिकेटपटूंनी घालून दिलं आहे.”
“हा विजय मी आतापर्यंतच्या सर्व विश्वचषकांपेक्षा मोठा मानतो. कारण यामुळे देशभरातील असंख्य मुली क्रिकेटकडे करिअरच्या पर्याय म्हणून पाहतील. हा विजय भारतीय महिला क्रिकेट आणि समाजाच्या विचारसरणीत सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरेल, असा विश्वासही आर. अश्विनने व्यक्त केला आहे.
भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये मिळून तिसरा वन-डे विश्वचषक जिंकला आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषकावर आपली मोहोर उटवत इतिहास रचला होता. यानंतर २०११ मध्ये महेंद्रसिंह धोनी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला. यानंतर आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने तिसरा किताब जिंकला आहे. याशिवाय भारतीय पुरुष संघाने २००७, २०२४ दोन टी-२० विश्वचषक जिंकले आहेत.