

नवी दिल्ली | Pro Kabaddi 2024 : प्रो-कबड्डी लीग २०२४-२५ चे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. स्पर्धेचा शेवटचा टप्पा ते २४ डिसेंबरअखेर पुण्यात खेळवण्यात येणार आहे.
प्रो-कबड्डीचा यंदाचा मोसम १८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. स्पर्धेतील सामने हैदराबाद, ग्रेटर नोएडा आणि पुणे या तीन शहरांमध्ये खेळवण्यात येतील. १८ ऑक्टोबरला पहिला सामना तेलुगू टायटन्स विरुद्ध बंगळुरू बुल्स यांच्यात होईल. याच दिवशी यू मुंबा आणि दबंग दिल्ली यांच्यात दुसरा सामना होईल. हैदराबाद टप्पा हा १८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर असा असेल, तर नोएडा येथे १० नोव्हेंबर ते १ डिसेंबर आणि पुणे येथे ३ ते २४ डिसेंबर असे टप्पे पार पडतील. प्ले ऑफ, उपांत्य फेरी आणि फायनल्सचे स्थळ नंतर ठरवली जाणार आहेत.