

Pro Govinda League
मुंबई : प्रो-गोविंदा लीग दहीहंडी स्पर्धेच्या तिसर्या हंगामाचा अंतिम सामना वरळी येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडियाच्या (एनएससीआय) डोममध्ये 7 ते 9 ऑगस्ट 2025 या कालावधीत रंगेल. यंदा विजेतेपदासाठी राज्यभरातील 16 गोविंदा पथकांमध्ये चुरस आहे.
यंदाच्या हंगामासाठी ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून वेस्ट इंडिजचा प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ख्रिस गेल याची निवड करण्यात आली आहे. तिसर्या हंगामात नागपूर निंजास, अलिबाग नाईटस्, शूर मुंबईकर, ठाणे टायगर्स, मीरा भाईंदर लायन्स, नाशिक रेंजर्स, दिल्ली इगल्स, सुरत टायटन्स, जयपूर किंग्ज, बंगळूर ब्लेझर्स, हैदराबाद डायनामोज, गोवा सर्फर्स, वाराणसी महादेव असेंडर्स, लखनौ पँथर्स, नवी मुंबई स्ट्रायकर्स, मुंबई फाल्कन्स योद्धा यांच्यात जेतेपदासाठी झुंज रंगेल.
प्रो-गोविंदा यंदाच्या हंगामात एकूण दीड कोटीची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. विजेत्याला 75 लाख रुपये, उपविजेत्याला 50 लाख आणि तिसर्या क्रमांकावरील संघाला 25 लाख रुपये मिळतील. उर्वरित सहभागी संघांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी 3 लाख रुपये दिले जाणार आहेत.