'छोटा' बुमराह PM मोदींच्‍या भेटीला! 'ताे' एक क्लिक तुफान व्‍हायरल

टीम इंडियाने साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर संवाद
T20 World Cup 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याबरोबरील भेटीवेळी बुमराहची पत्नी संजना गणेशन आणि त्‍याचा मुलगा अंगद बुमराह हाही उपस्‍थित होता. Twitter
Published on
Updated on

टी-20 विश्‍वविजेत्‍या टीम इंडियाबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. ४) दिल्लीतील लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी विशेष संवाद साधला. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीची झलक शेअर केली आहे.

छाेट्या बुमराहचा फाेटाे तुफान व्‍हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याबरोबरील भेटीवेळी बुमराहची पत्नी संजना गणेशन आणि त्‍याचा मुलगा अंगद बुमराह हाही उपस्‍थित होता. पंतप्रधान मोदींनी बुमराह, संजना आणि त्यांचा मुलगा अंगद बुमराह यांच्यासोबत पोज दिली. यावेळी मोदींनी अंगदला कडेवर घेतलला फोटो सोशल मीडियावर तुफान व्‍हायरल होत आहे.

पंतप्रधानांना भेटणे हा मोठा सन्मान : विराट कोहली

विराट कोहली, ऋषभ पंत आणि युझवेंद्र चहल यांच्यासह अन्‍य भारतीय खेळाडूंनीही पंतप्रधान मोदींबरोबर संवादानंतर एक खास पोस्ट शेअर केली. विराट कोहलीने पंतप्रधानांना भेटणे हा मोठा सन्मान असल्याचे म्‍हटलं आहे. तसेच त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केल्याबद्दल त्‍याने आभारही मानले आहेत. विराट कोहलीने पंतप्रधानांशी हस्तांदोलन करतानाचा फोटोही शेअर केला आहे.

बार्बाडोसमधील टी-२० विश्वचषक विजयामुळे त्यांना भविष्यातील स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी आजच्‍या भेटीवेळी व्‍यक्‍त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news