गुकेशच्या यशामुळे तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळेल : पीएम मोदी

World Chess Championship 2024 | पंतप्रधान मोदी यांच्याकडून गुकेश डीचे अभिनंदन
World Chess Championship 2024
जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुकेश डीचे अभिनंदन केले आहे.Pudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरातील बुद्धिबळ प्रेमींचे लक्ष वेधलेल्‍या जागतिक बुद्धिबळ अजिंक्‍यपद स्‍पर्धेत भारताचा आव्‍हानवीर दोम्‍माराजू गुकेशने (D Gukesh) आज (दि.१२) इतिहास रचला. वयाच्‍या अवघ्‍या १८ व्‍या वर्षी त्‍याने जगज्‍जेता डिंग लिरेन (Ding Liren) याचा पराभव करत जागतिक बुद्धिबळ अजिंक्‍यपदाला गवसणी घातली. (World Chess Championship 2024) सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुकेश डीचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी 'एक्स' वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, गुकेशचे यश हे त्याच्या अतुलनीय प्रतिभा, कठोर परिश्रम आणि अटल निर्धाराचे प्रतिक आहे. त्याच्या विजयाने केवळ बुद्धिबळाच्या इतिहासात त्याचे नाव कोरले नाही. तर लाखो तरुण मनांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्याची प्रेरणा दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news