पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा भालाफेकपटू किशोर जेना याने आज (दि. ६) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात केली. आज पात्रता फेरीत किशोर जेनाने जेनाने पहिल्याच प्रयत्नात 80.73 मीटर भाला फेकत ताे दुसर्या स्थानावर राहिला.किशोर जेनाने तिसऱ्या आणि शेवटच्या थ्रोमध्ये 80.21 मीटर भालाफेक केली. पात्रता फेरीत तो सध्या 9व्या क्रमांकावर राहिला. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी 84 मीटर भाला फेकणे बंधनकारक होते.
यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकुण ३२ भालाफेकपटू पात्र ठरले आहेत. त्यांचे प्रत्येकी १६ अशा दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. 32 मधील 12 खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. पात्रता मानक 84 मीटरवर सेट केले आहे, याचा अर्थ ८४ मीटर भाला फेकणारा खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.मात्र ८४ मीटर अंतर भाला फेकण्यास खेळाडू पात्र ठरले नाही तर अंतरानुसार 12 सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे अंतिम फेरीत प्रवेश करणार आहेत.