Paris Olympic 2024 : मनू भाकर १० मीटर एअर पिस्तूलच्‍या अंतिम फेरीत

पात्रता स्‍पर्धेत तिसर्‍या स्‍थानी, आता सर्वांचे लक्ष फायनलकडे
Paris Olympic 2024
पॅरिस ऑलिम्पिकमध्‍ये मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.X

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पॅरिस ऑलिम्पिकमध्‍ये मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. पात्रता स्‍पर्धेत तिने 580-27 गुणांसह तिसरे स्थान पटकावले.

मनू भाकरने पात्रता स्‍पर्धेत अचूकता आणि दृढनिश्चय याचे मिश्रण दिसून आले. तिसे 580 गुणांसह अंतिम फेरीतील आपले स्‍थान निश्चित केले. टोकियो ऑलिम्पिक स्‍पर्धेत मनूला अपेक्षित कामगिरी करता आली नव्‍हती. मात्र तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्‍ये जोरदार पुनरागमन केले आहे. आता अंतिम फेरीतील तिच्‍या कामगिरीकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे.

उद्या दुपारी अंतिम फेरी

१९ वर्षांच्या मनू भाकरने टोकियो ऑलिम्पिकमध्ये तीन स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. तिच्या 10 मीटर एअर पिस्तूल पात्रतेमध्ये पिस्तुल खराब झाली. यामुळे तीनपैकी कोणत्याही प्रकार तिला अंतिम फेरीत पोहचला आलं नव्‍हतं. मात्र पॅरिस ऑलिम्‍पिकमध्‍ये तिने जोरदार पुनरागमन केले आहे. आता रविवारी २७ जुलै रोजी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी अंतिम फेरीतील तिच्‍या कामगिरीकडे देशवासियांचे लक्ष वेधले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news