Pakistan vs Sri Lanka | फरहानचे विक्रमी शतक; पाकिस्तानचे श्रीलंकेसमोर 213 धावांचे विशाल लक्ष्य

Pakistan vs Sri Lanka |
Pakistan vs Sri Lanka | फरहानचे विक्रमी शतक; पाकिस्तानचे श्रीलंकेसमोर 213 धावांचे विशाल लक्ष्य
Published on
Updated on

कोलंबो; वृत्तसंस्था : सलामीवीर साहिबजादा फरहानचे स्पर्धेतील दुसरे शतक आणि फखर झमानच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने टी-20 विश्वचषकाच्या सुपर-8 मधील निर्णायक सामन्यात श्रीलंकेसमोर 212 धावांचा डोंगर उभा केला. उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानने श्रीलंकेला 147 धावांमध्ये रोखणे अनिवार्य होते.

पाकिस्तानच्या सलामीवीरांनी शनिवारी या निर्णायक लढतीत श्रीलंकन गोलंदाजीच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या. फरहान आणि फखर या जोडीने पहिल्या विकेटसाठी 176 धावांची विक्रमी भागीदारी रचली. या मोठ्या धावसंख्येमुळे पाकिस्तानने श्रीलंकेवर मानसिक दडपण निर्माण केले होते. 65 पेक्षा अधिक धावांनी विजय मिळवल्यास त्यांचे उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित होणार होते.

फरहानचा ऐतिहासिक विक्रम

साहिबजादा फरहानने या विश्वचषकातील आपले दुसरे शतक झळकावत इतिहास रचला. एकाच टी-20 विश्वचषकात दोन शतके ठोकणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने अवघ्या 60 चेंडूंत 100 धावांची खेळी केली. यात 9 चौकार, 5 षटकारांचा समावेश होता. दुसरीकडे, सलामीला बढती मिळालेल्या फखर झमाननेही आक्रमक पवित्रा घेत 42 चेंडूंत 84 धावा कुटल्या. फखरने 200 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 9 चौकार आणि 4 षटकार खेचले.

श्रीलंकेचे पुनरागमन

एकवेळ पाकिस्तान 250 धावांचा टप्पा ओलांडेल असे वाटत होते, मात्र श्रीलंकेने डेथ ओव्हर्समध्ये जबरदस्त पुनरागमन केले. दिलशान मदुशंकाने भेदक मारा करत 3 बळी टिपले. पाकिस्तानची मधली फळी व तळाची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. शादाब खान (7), मोहम्मद नवाज (0), सलमान अली आगा (0), शाहिन आफ्रिदी (4) आणि नसीम शाह (1) स्वस्तात बाद झाले.

शेवटच्या 2 षटकांत पाकने गमावले 14 धावांत 5 बळी!

पाकिस्तानने या लढतीत एकवेळ 18 षटकांत 3 बाद 198 अशी जोरदार मजल मारली होती. मात्र, शेवटच्या 2 षटकांत विकेटस् एकापाठोपाठ एक तंबूत परतण्याचा जणू धडाकाच लागला आणि अवघ्या 14 धावांत पाकने तब्बल 5 गडी गमावले. या पडझडीनंतर पाकिस्तानच्या खात्यावर 20 षटकांत 8 बाद 212 धावा नोंद झाल्या.

पाकिस्तान : 20 षटकांत 8/212 (साहिबजादा फरहान 60 चेंडूंत 9 चौकार, 5 षटकारांसह 100, फखर झमान 42 चेंडूंत 9 चौकार, 4 षटकारांसह 84. दिलशान मदुशंका 33 धावांत 3 बळी, दासून शनाका 42 धावांत 2 बळी, दुष्मंता चमिरा 1/48).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news