

Pakistan announce squad for T20 World Cup
इस्लामाबाद : एकीकडे टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्याबाबतचा निर्णय पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निर्णयावर अवलंबून आहे, असे सांगत बहिष्काराची धमकी पाकिस्तानने दिली होती. यानंतर आज पाकिस्तान क्रिकेट बोर्डने टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला. संघाचे नेतृत्व सलमान अली आगा यांच्याकडे राहणार आहे.
भारतात खेळणार नाही, या हट्टावर बांगलादेश कायम राहिला. यानंतर बांगलादेशची हकालपट्टी करत आयसीसीने स्कॉटलंडला संधी दिली. यावर या निर्णयावर पाकिस्तानने टीका केली. आयसीसीने टी-२० विश्वचषकातून बांगलादेशला वगळले आणि त्याच्या जागी स्कॉटलंडचा समावेश केला. नक्वी यांनी या मुद्द्यावर आयसीसीवर टीका केली आणि पक्षपातीपणाचा आरोप केला. टी-२० विश्वचषकात सहभागी होण्याचा अंतिम निर्णय पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेतला जाईल असेही नक्वी यांनी सांगितले होते.
पाकिस्तानच्या संघात बाबर आझमचा समावेश केल्याने त्याचा अनुभव उपयुक्त ठरू शकतो. दरम्यान, हरिस रौफच्या अनुपस्थितीत वेगवान आक्रमणाची जबाबदारी शाहीन आणि नसीम शाह यांच्यावर असेल. फहीम अश्रफ, शादाब खान आणि मोहम्मद नवाज या अष्टपैलूंनाही संधी मिळाली आहे.
पाकिस्तान ग्रुप अ मध्ये आहे, ज्यामध्ये गतविजेता भारत, नेदरलँड्स, अमेरिका आणि नामिबिया यांचाही समावेश आहे. पाकिस्तान ७ फेब्रुवारी रोजी नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यातून आपली मोहीम सुरू करेल. पाकिस्तान त्यांचे सर्व टी-२० विश्वचषक सामने श्रीलंकेत खेळेल.
टी-२० विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ: सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, फखर जमान, ख्वाजा मोहम्मद नाफे (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, शाहिबजादा फरहान (यष्टीरक्षक), सैम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, उस्मान खान, उस्मान तारिक.