

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील 5 कसोटी सामन्यातील चौथा सामना मेलबर्न येथील 'एमसीजी' स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज (दि.28) या सामन्यातील तिसरा दिवस सुरु आहे. भारतीय संघाच्या डावाची पडझड होत असताना, टीम इंडियाचा नवोदित अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीने(Nitish Kumar Reddy )संघांची हातात घेतली. या सामन्यात त्याने 171 चेंडूत 103 धावांची झुंझार खेळी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावले. या खेळीदरम्यान त्याने 10 चौकार आणि 1 षटकार ठोकला. त्याच्या या संयमी खेळीची सर्वत्र चर्चा होत आहे. या सोबतच त्याने आपल्या नावे 'हे' विक्रम केले आहेत, ते आपण जाणून घेऊया...
ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय फंलदाजाने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वात जास्त धावा बनवण्याचा रेकॉर्ड नितिशने आपल्या नावे केला आहे. या पुर्वी अनिल कुंबळे यांनी 2008 मध्ये आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 87 धावा केल्या होता. या डावात 88 धावा केल्यानंतर मोडीत निघाला. हा विक्रम नितीशने मोडला आहे.
88* नितीश रेड्डी मेलबर्न 2024
87 अनिल कुंबळे ॲडलेड 2008
81 रवींद्र जडेजा सिडनी 2019
67* किरण मोरे मेलबर्न 1991
67 शार्दुल ठाकूर ब्रिस्बेन 2021
आज सामन्याच्या तिसर्या दिवसाची सुरुवातही भारतासाठी खराब झाली. पंत 28 धावांवर बाद झाला. तेव्हा संघाची धावसंख्या 6 बाद 191 अशी होती. यावेळी नितीश मैदानामध्ये फलंदाजीसाठी उतरला. यावेळी भारतीय संघाला फॉलोऑन टाळण्यासाठी आणि 84 धावांची गरज होती. यानंतर त्यांने डावाची कमान आपल्या हातामध्ये घेत संतगतीने धावफलक चालता ठेवला. जडेजा बाद झाल्यानंतर सुंदरसोबत 50 + धावांची भागिदारी करत नितिशने आणि सुंदरने फॉलोऑन टाळला.