मी ठणठणीत : अ‍ॅलेक्स हेल्स

लंडन : वृत्तसंस्था

इंग्लंडचा सलामीवीर अ‍ॅलेक्स हेल्स याच्या प्रकृतीत कोरोनाची लक्षणे आढळल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. त्यामुळेच पाकिस्तान सुपर लीग पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याची चर्चाही दिवसभर रंगली. परंतु, स्पर्धेतून मायदेशी परतलेल्या अ‍ॅलेक्सने स्वत:च आपण ठणठणीत असल्याचा खुलासा केला आहे. 

मायदेशातून हेल्सने अपडेटस् दिले आहेत. तो म्हणाला, 'सोशल मीडियावर माझ्याबद्दल बर्‍याच अफवा फिरत आहेत आणि मला त्यावर स्पष्टीकरण द्यायचे आहे. अन्य परदेशी खेळाडूंप्रमाणे मीही पाकिस्तान सुपर लीग सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. कुठेतरी अडकून राहण्यापेक्षा कुटुंबीयांसोबत राहणे मी महत्त्वाचे मानले. शनिवारी मी मायदेशात परतलो. मी पूर्णपणे तंदुरुस्त होतो, पण रविवारी मला ताप आला होता आणि त्यावेळी मी स्वतःला सर्वांपासून वेगळे ठेवून, सरकारच्या आदेशाचे पालन केले आहे. सध्यातरी कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत.'

पाकिस्तान सुपर लीगमध्ये हेल्सने 7 सामन्यांत 59.75 च्या सरासरीने 239 धावा केल्या आहेत.

 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news