पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज टिम साउथीने इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेनंतर खेळाच्या प्रदीर्घ फॉर्मेटमधून निवृत्त होणाच्या घोषणा केली आहे. त्याचा शेवटचा सामना न्युझीलंडमधील स्वानसाँग ख्रिसमसच्या आधी हॅमिल्टन येथील सेडॉन पार्क येथे त्याच्या घरच्या मैदानावर होणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती वृत्तसंस्था 'एएनआय'ने दिली आहे.
साऊथीने न्युझीलंडकडून जवळपास 400 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 770 बळी घेऊन न्यझीलंडकडून सर्वाधिक बळी घेण्याचा बहुमान मिळवला आहे. साऊथीने चार क्रिकेट विश्वचषक, सात टी-20 विश्वचषक, दोन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा यामध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2021मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकलेल्या संघामध्येही तो सामील होता.
त्याने निवृत्तीची घोषणा केली त्यावेळी बोलताना तो म्हणाला, "कसोटी क्रिकेटपासून दूर जाण्याची आणि न्यूझीलंडच्या पुढील पिढीच्या गोलंदाजांना चमकण्याची संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे. न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करणे हेच मी मोठे होण्याचे स्वप्न पाहिले होते. 18 वर्षे ब्लॅक कॅप्ससाठी खेळणे हा सर्वात मोठा सन्मान आणि विशेषाधिकार आहे, परंतु ज्या खेळाने मला खूप काही दिले आहे त्यापासून दूर जाण्याची हीच वेळ आहे, " साउथीने आयसीसीच्या हवाल्याने ठामपणे सांगितले.
खेळलेले सामने - 104
बनवलेल्या धावा - 2185, अर्धशतके - 7
घेतलेले बळी - 385
सर्वोत्कृष्ठ प्रदर्शन - 7/64
पहिली कसोटी: 28 नोव्हेंबर - 2 डिसेंबर, हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च.
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन.
तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर, सेडॉन पार्क, हॅमिल्टन.