MI vs SRH
मुंबई इंडियन्सची गाडी रुळावर

मुंबई इंडियन्सची गाडी रुळावर

MI vs SRH : सनरायझर्स हैदराबादवर 4 विकेटस्नी विजय
Published on

मुंबई : मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा शानदार पराभव करत यंदाच्या मोसमातील सलग दुसरा विजय नोंदवला आहे. तिलक वर्माच्या चौकारासह मुंबईने हैदराबादचा 4 विकेटस्ने पराभव केला. मुंबई इंडियन्सला सनरायझर्स हैदराबादने विजयासाठी 163 धावांचे आव्हान दिले होते. मुंबई इंडियन्सने हे आव्हान 18.1 षटकांत 6 बाद 166 धावा करून पूर्ण केले. या विजयानंतरही मुंबईचा संघ सातव्या स्थानीच असणार आहे, तर हैदराबादचा संघ 9 व्या स्थानी आहे.

गोलंदाजांनी हैदराबादच्या तोफा 162 धावांतच शांत केल्यानंतर या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि रायन रिक्लेटन यांनी धडाक्यात सुरुवात केली. पहिली दोन षटके शांततेत गेल्यानंतर तिसर्‍या षटकांत रोहितने शमीला दोन षटकार ठोकले. पॅट कमिन्सच्या षटकाचे स्वागतही षटकारानेच केले. पाचव्या चेंडूवर रोहित ट्रॅव्हिस हेडकडे झेल देऊन बाद झाला. त्याने 16 चेंडूंत 26 धावा केल्या.

त्यानंतर विल जॅक्स आणि रिकेल्टन यांनी 37 धावा जोडल्या. हर्षल पटेलने रिकेल्टनची खेळी 31 धावांवर संपुष्टात आणली. यानंतर सूर्यकुमार यादवने आपल्या स्टाईलने धुलाई सुरू केली; परंतु त्याची बहरत जाणारी खेळी कमिन्सने रोखली. सूर्या 15 चेंडूंत 26 धावा करून बाद झाला. कमिन्सने आपली तिसरी विकेट घेताना विल जॅक्सला 36 धावांवर बाद केले. यानंतर तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या यांनी गाडी विजयी स्टेशनच्या जवळ आणली; परंतु 18 व्या षटकात मोठा ड्रामा पाहायला मिळाला. मुंबईला विजयासाठी 2 धावांची गरज असताना तिलकने एक धाव घेत हार्दिकला स्ट्राईक दिली. हार्दिक पंड्या (21 धावा, 9 चेंडू) पुढच्या चेंडूवर झेलबाद झाला. तर नमन धीर दोन चेंडूंवर एकही धाव काढू शकला नाही, तर पाचव्या चेंडूवर नमन धीर पायचीत झाला. अखेरच्या चेंडूवर सँटेनर एक धाव घेण्यात अपयशी ठरला. अखेरीस तिलक वर्माने 19 व्या षटकात झीशान अन्सारीच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हैदराबादकडून पॅट कमिन्सने 26 धावांत 3 विकेटस् घेतल्या.

तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादला 5 बाद 162 धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. हैदराबादने शेवटच्या तीन षटकांत 47 धावा केल्याने ते दीडशेपार पोहोचू शकले. अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड यांना जीवदान मिळूनही अनुक्रमे 40 व 28 धावा करता आल्या. चहरने टाकलेल्या 18व्या षटकात हेन्रिच क्लासेनने 21 धावा चोपल्या. जसप्रीत बुमराहने 19 व्या षटकात त्याचा त्रिफळा उडवला. तो 28 चेंडूंत 37 धावांवर बाद झाला. अनिकेत वर्मा व पॅट कमिन्स यांनी 20 व्या षटकात 22 धावा जोडल्या. त्याने 8 चेंडूंत 18 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

सनरायझर्स हैदराबाद : 20 षटकांत 5 बाद 162 धावा. (अभिषेक शर्मा 40, हेन्रिक क्लासेन 37. विल जॅक्स 2/14)

मुंबई इंडियन्स : 18.1 षटकांत 6 बाद 166 धावा. (विल जॅक्स 36, हार्दिक पंड्या 21. पॅट कमिन्स 3/26)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news