Mohammed Shami Ranji Trophy : सात विकेट्सचा फिटनेस.... मोहम्मद शमीनं अजित आगरकरला दाखवला आरसा

एका मुलाखतीत अजित आगरकरनं मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत वक्तव्य केलं होतं.
Mohammed Shami Ranji Trophy
Mohammed Shami Ranji Trophy Pudhari Photo
Published on
Updated on

Mohammed Shami Ranji Trophy :

फिटनेस आणि वनडे संघात स्थान देण्यावरून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्यात शाब्दिक देवाण घेवाण झाली होती. त्यानंतर आता मोहम्मद शमीनं मैदानावर आपल्या कामगिरीचं नाणं खणखणीत वाजवून दाखवत एकप्रकारे त्याच्या फिटनेसवर शंका घेणाऱ्या अजित आगरकर यांना आरसाच दाखवला आहे.

रणजी ट्रॉफी २०२५ - २६ च्या हंगामातील बंगालचा पहिला सामना हा उत्तराखंड विरूद्ध होता. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर सुरू आहे. या सामन्यात बंगालकडून खेळणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं धमाका केला आहे. शमीनं बंगालकडून दोन्ही डावात दमदार गोलंदाजी केली. त्यानं पहिल्या डावात ३७ धावा देत तीन विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावात त्यानं ३८ धावात ४ विकेट्स घेतल्या. संपूर्ण सामन्यात शमीनं सात विकेट्स घेत चांगली कामगिरी केली.

Mohammed Shami Ranji Trophy
Archery World Cup : ज्योती वेन्नमने तिरंदाजी विश्वचषक स्‍पर्धेत रचला इतिहास!

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत अजित आगरकरनं मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत वक्तव्य केलं होतं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वनडे संघाची निवड करताना मोहम्मद शमी फिट नव्हता असं त्यांना सांगितलं. मोहम्मद शमी भारताकडून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये शेवटचा खेळला होता.

त्यानंतर भारतीय संघानं इंग्लंड दौरा केला, आशिया कप खेळला तसंच मायदेशात वेस्ट इंडीज सोबत कसोटी मालिका देखील झाली. मात्र शमीला संघात काही स्थान मिळालं नाही. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्याला देखील तो मुकला आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन वनडे आणि पाच टी २० सामन्यांची मालिका खेळणार आहे.

संघातून डावलल्यानंतर मोहम्मद शमीनं पत्रकारांशी बोलताना, 'संघ निवड माझ्या हातात नसते. जर माझ्या फिटनेसशी संबंधित काही अडचण असती तर मी आज बंगालकडून खेळण्यासाठी इथं आलो नसतो तर एनसीएमध्ये तंदुरूस्त होत असतो. जर मी चार दिवसांचा सामना खेळू शकतो तर मी ५० षटकांचा सामना देखील खेळू शकतो. मला अजून काही सांगायची गरज नाहीये. मला कोणत्याही वादात पडायचं नाही.'

Mohammed Shami Ranji Trophy
Suryakumar Yadav On ODI Captaincy : तर वनडेची कॅप्टन्सी देखील माझ्याकडं आली असती... सूर्यकुमार यादवचा गौप्यस्फोट

अजित आगरकर यांनी पूर्वी सांगितले होते की शमीला कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी काही लाल चेंडूचे (रेड बॉल) सामने खेळावे लागतील, कारण 'एक खेळाडू म्हणून तो काय करू शकतो हे आम्हाला माहीत आहे, पण त्याला काही क्रिकेट खेळणे आवश्यक आहे.' मोहम्मद शमीने दुखापतीतून सावरल्यानंतर आतापर्यंत केवळ ९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news