

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohhmad Shami ) आणखी एक विक्रम त्याच्या नावे केला आहे. त्याने आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये फक्त १४ सरासरीने उत्कृष्ठ गोलंदाजी केली आहे. आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये २० डावांमध्ये १४ च्या सरासरीने ६० बळी घेतले आहेत. अशी कामगिरी करणाऱ्या गोंलदाजाच्या यादीमध्ये तो अव्वल बनला आहे. तसेच त्याने दिगज्ज गोलंदाज मिल्स- ग्लेन मॅक्ग्रा यांना देखील मागे टाकले आहे.
मोहम्मद शमीने अशी कामगिरी करत न्यूझीलंडचा काइल मिल्स, ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा, पाकिस्तानचा इम्रान खान आणि ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न यांना मागे सोडले आहे.
शमीने कमीत कमी 30 विकेट्स घेतलेल्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याच्या खालोखाल हे खेळाडू आहेत:
काइल मिल्स (न्यूझीलंड) - 17.3 च्या सरासरीने विकेट्स
ग्लेन मॅक्ग्रा (ऑस्ट्रेलिया) - 18.5 च्या सरासरीने विकेट्स
इमरान खान (पाकिस्तान) - 19.3 च्या सरासरीने विकेट्स
शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) - 19.5 च्या सरासरीने विकेट्स
आज होणाऱ्या सामन्यामध्ये न्यूझीलंडलाही शमीपासून सावध राहण्याची गरज आहे. शमीने न्यूझीलंडच्या विरुद्ध शेवटचा सामना २०२३ च्या विश्वचषक उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात या वेगवान गोलंदाजाने ५७ धावांत ७ बळी घेत त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आणि भारताला अंतिम फेरीत पोहोचवले.