French Open women’s final : मिरा अंद्रीव्हाने कोरले 'फ्रेंच ओपन'वर आपलं नाव, वयाच्या 19 वर्षी पटकावले पहिले ग्रँड स्लॅम!

अंतिम सामन्यात च्वॉलिंस्काचा ६-३, ६-२ असा पराभव
French Open women’s final : मिरा अंद्रीव्हाने कोरले 'फ्रेंच ओपन'वर आपलं नाव,  वयाच्या 19 वर्षी पटकावले पहिले ग्रँड स्लॅम!
Published on
Updated on

French Open women’s final : फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात रशियाच्‍या मिरा अंद्रीव्हाने पोलंडच्‍या माजा च्वॉलिंस्काचा ६-३, ६-२ असा पराभव केला. आठव्या मानांकित १९ वर्षीय अंद्रीव्हाने आपल्या कारकिर्दीतील पहिलेवहिले फ्रेंच ओपन विजेतेपद पटकावले आहे.

अवघ्या १ तास २२ मिनिटांत सरळ सेटमध्ये सामना जिंकला

मिरा अंद्रीव्हाने अवघ्या १ तास २२ मिनिटांत ६-३, ६-२ अशा सरळ सेटमध्ये जागतिक क्रमवारीत ११४ व्या स्थानी असलेल्या च्वॉलिंस्कावर दिमाखदार विजय मिळवला. सुरुवातीला च्वॉलिंस्काने दिलेल्या कडव्या प्रतिकारानंतर रशियन खेळाडूने सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. 'डब्ल्युटीए टूर' (WTA Tour) वर तिच्या यशाचे गमक ठरलेला संयम आणि उत्कृष्ट शॉट्सचे प्रदर्शन करत तिने अखेर फ्रेंच फ्रेंच ओपनचे ग्रँड स्‍लॅम आपल्‍या नावावर केले.

French Open women’s final : मिरा अंद्रीव्हाने कोरले 'फ्रेंच ओपन'वर आपलं नाव,  वयाच्या 19 वर्षी पटकावले पहिले ग्रँड स्लॅम!
French Open Big upset | फ्रेंच ओपनमध्ये मोठा उलटफेर; अग्रमानांकित सबालेंकाचा खळबळजनक पराभव; डायना श्नायडरची उपांत्य फेरीत धडक!

च्वॉलिंस्काने दिली दुसर्‍या सेटमध्‍ये झुंज पण...

दुसर्‍या सेटमध्‍ये मिरा अंद्रीव्हा ५-० अशा फरकाने विजयाच्या उंबरठ्यावर असतानाच, या पोलंडच्‍या आव्हाहकाने जोरदार पुनरागमन केले. तिने लागोपाठ दोन गेम्स जिंकले आणि सामन्यात तिसऱ्यांदा अंद्रीव्हाची सर्व्हिस ब्रेक करण्यात यश मिळवले. दुसऱ्या सेटमध्ये आता ५-२ असा स्कोअर झाला असून, च्वॉलिंस्काने अंद्रीव्हाला विजेतेपदाच्या ट्रॉफीसाठी आणखी थोडी प्रतीक्षा करण्यास भाग पाडले आहे.

French Open women’s final : मिरा अंद्रीव्हाने कोरले 'फ्रेंच ओपन'वर आपलं नाव,  वयाच्या 19 वर्षी पटकावले पहिले ग्रँड स्लॅम!
Satwik Chirag Singapore Open | सात्विक-चिरागने कोरले सिंगापूर ओपनवर नाव! इंडोनेशियाच्या जोडीचा केला पराभव

अंतिम सामना झाला एकतर्फी

सामन्याची सुरुवात चुरशीची झाली असली, तरी अखेर तो एकतर्फी झाला. च्वॉलिंस्काच्या विविध प्रकारच्या शॉट्सचा अचूक सामना करण्याची अंद्रीव्हाची क्षमता आणि कोर्टमध्ये पुढे येत आक्रमक खेळ करण्याची तिची वृत्ती यामुळे या सामन्याचा निकाल लागला.१९ वर्षीय अंद्रीव्हाची ही पहिलीच ग्रँड स्लॅम अंतिम फेरी होती आणि यात तिने आपले पहिलेवहिले ग्रँड स्लॅम एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. २०२० मध्ये पोलंडच्या इगा श्वीऑनटेकने विजेतेपद मिळवल्यानंतर, फ्रेंच ओपनचा मुकुट जिंकणारी अंद्रीव्हा ही पहिलीच 'टीनेजर' (किशोरी) खेळाडू ठरली आहे.

अंद्रीव्हाने पहिला सेटमध्‍ये पडली भारी ?

पहिल्या सेटमध्ये स्कोअर ३-३ असा बरोबरीत होता आणि च्वॉलिंस्का सर्व्हिस करत होती. ती मजबूत स्थितीत दिसत होती.ती आपल्या शॉट्समधील वैविध्य, चेंडूचा बदलता वेग, फिरकी (spins) आणि नेटवरील चेंडूची उंची बदलून अंद्रीव्हाला अडचणीत आणत होती. सलग नऊ सामन्यांमध्ये तिने अशीच कामगिरी केली होती आणि आजही ती त्याच लयीत दिसत होती.पण गेममध्ये ३०-३० अशी स्थिती असताना, च्वॉलिंस्काचा एक शॉर्ट फोरहँड कोर्टच्या बाहेर गेला आणि अंद्रीव्हाला 'ब्रेक पॉईंट' मिळाला. त्यानंतर च्वॉलिंस्काने एक बॅकहँड स्लाइस थेट नेटमध्ये मारला. गेल्या दोन आठवड्यांपासून तिचे जे शॉट्स तिची ताकद बनले होते, तेच शॉट्स आता अंद्रीव्हासाठी भेट ठरले आणि अंद्रीव्हाने ४-३ अशी आघाडी घेतली.येथून सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलले. अंद्रीव्हाने पुढील २१ पैकी २० गुण जिंकले. जणू काही एका झटक्यात तिने सामन्याचा नूरच बदलून टाकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news