Manisha Bhanwala | जागतिक कुस्तीत ‘सुवर्ण’ पटकावणारी मनीषा भानवाला पहिली भारतीय

Manisha Bhanwala |
Manisha Bhanwala | जागतिक कुस्तीत ‘सुवर्ण’ पटकावणारी मनीषा भानवाला पहिली भारतीय
Published on: 
Updated on: 

अस्ताना; वृत्तसंस्‍था : जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत मनीषा भानवालाने सुवर्णपदक जिंकून भारताची पहिली महिला विश्वविजेती मल्ल होण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला. अस्ताना येथे शुक्रवारी पार पडलेल्या अटीतटीच्या अंतिम लढतीत २९ वर्षीय मनीषाने अमेरिकेच्या ए. एलिझाबेथ नेटचा ८-६ असा पराभव केला. ५९ किलो गट हा ऑलिम्पिक वर्गवारीत मोडत नसला, तरी यापूर्वी कोणत्याही भारतीय महिला मल्लाला जागतिक विजेतेपद मिळवता आले नसल्यामुळे मनीषाची ही कामगिरी विशेष लक्षवेधी ठरली.

या स्‍पर्धेत यापूर्वी नीलम सिरोही (५० किलो) आणि काजल ढोचक (७६ किलो) या अन्य दोन मल्लांनी ऑलिम्पिक वजनी गटाच्या अंतिम फेरीत धडक मारत रौप्यपदके पटकावली आहेत. या स्पर्धेपूर्वी केवळ अंशू मलिक हिलाच २०२१ मधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या ५७ किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठता आली होती; त्यावेळी तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार हा भारताचा एकमेव विश्वविजेता मल्ल राहिला आहे. त्याने २०१० मध्ये मॉस्को येथे पार पडलेल्या जागतिक स्पर्धेत ६६ किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते. याव्यतिरिक्त बजरंग पुनियाने २०१८ मध्ये बुडापेस्ट येथील जागतिक स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.