Wimbledon 2026 | झेकची नोस्कोव्हा ‘विम्‍बल्‍डन सम्राज्ञी’

Wimbledon 2026 |
Wimbledon 2026 | झेकची नोस्कोव्हा ‘विम्‍बल्‍डन सम्राज्ञी’Kirsty Wigglesworth
Published on
Updated on

लंडन; वृत्तसंस्था : टेनिस जगतातील सर्वात प्रतिष्‍ठेच्‍या ‘विम्बल्डन’ खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात झेक प्रजासत्ताकच्या लिंडा नोस्कोव्हाने इतिहास रचला. २१ वर्षीय नोस्कोव्हाने आपल्याच देशाच्या कॅरोलिना मुचोव्हाचा ६-२, ५-७, ६-३ असा पराभव करत कारकिर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

सुरुवातीला नोस्कोव्हाने पहिला सेट ६-२ असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही तिने ५-३ अशी भक्कम आघाडी घेतली होती. विजयासाठी केवळ एका गुणाची गरज असताना आणि हाताशी ५ मॅच पॉईंटस्‌ असताना नोस्कोव्हावर दबावाचा परिणाम दिसला. मुचोव्हाने याचा फायदा उठवत सलग पाच गेम्स जिंकले आणि दुसरा सेट ७-५ असा खिशात घालत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. मात्र, नोस्कोव्हाने तिसऱ्या निर्णायक सेटमध्ये सहाव्या मॅच पॉईंटवर उत्कृष्ट सर्व्हिस विनर मारत सामना जिंकला आणि मैदानावरच पाठ टेकवून आनंद साजरा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news