केकेआर संघात फेरबदल, 'स्पीडस्टर' उमरान मलिकच्या जागी चेतन सकारियाची वर्णी!

Chetan Sakariya | दुखापतीमुळे उमरान मलिक आयपीएलमधून बाहेर
Chetan Sakariya
'स्पीडस्टर' उमरान मलिकच्या जागी चेतन सकारियाची वर्णी!Pudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाची (Chetan Sakariya ) उमरान मलिकच्या जागी पर्यायी खेळाडू म्हणून निवड केली आहे. आयपीएल 2025 हंगामाच्या आधी मलिकला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर जावे लागले आहे. या घटनेचे वृत्त 'क्रिकबज'ने दिले आहे.

image-fallback
IPL २०२१ : चेतन सकारियाला अनन्या पांडे सोबत जायचे आहे डेटवर!

75 लाखांत करारबद्ध

उमरान मलिकला गतविजेत्या संघाने 75 लाखांमध्ये खरेदी केले होते. दुसरीकडे, 27 वर्षीय सकारिया गेल्या हंगामात केकेआर संघात होता, मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर तो मोठ्या लिलावात न विकला गेल्यानंतर आता पुनश्च केकेआरकडून त्याला संधी मिळाली आहे. त्याला 75 लाखांमध्ये करारबद्ध करण्यात आले आहे.

सकारियाच्या नावावर 65 बळी

सकारियाने 2021 ते 2023 दरम्यान तीन हंगामांमध्ये 19 आयपीएल सामने खेळले असून, त्यात त्याने 8.43 च्या इकॉनॉमीने 20 बळी घेतले आहेत. त्याने राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण केले होते आणि नंतर 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्समध्ये गेला. एकूण टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 7.69 च्या इकॉनॉमीने 65 बळी घेतले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news