जय शहा यांनी केला पाकिस्तानचा गेम

जय शहा यांनी केला पाकिस्तानचा गेम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आशिया चषक 2023 स्पर्धेचा कार्यक्रम घोषित करण्यासाठी फक्त अर्ध्या तासाचा अवधी असतानाच बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी पाकिस्तानला क्लीन बोल्ड केल्याचे समोर आले आहे. पाकिस्तान आता कितीही गळा काढत असले तरी मात्र त्यांचा गेम केला, हे सत्य मात्र लपून राहणार नाही. हायब्रीड फॉर्म्युल्यानुसार आशिया चषकाचे फक्त चार सामने पाकिस्तानला देण्यात आले आणि बाकीचे श्रीलंकेत खेळवण्याचा निर्णय झाला. त्यानंतर पाकिस्तानमध्ये चांगलीच नाराजी होती, ती त्यांनी बोलूनही दाखवली. पण त्यामध्ये काहीच बदल झाला नाही. त्यानंतर आशिया चषकाचे अनावरण पाकिस्तानात करण्याचे ठरवण्यात आले. पाकिस्तानने मोठा घाट घातला.

सर्व क्रीडा विश्वाचे लक्ष पाकिस्तानवर होते. कारण, आशिया चषकाच्या कार्यक्रमाची घोषणा पाकिस्तानमध्ये होणार होती. पीसीबीने बुधवारी लाहोरमध्ये आशिया कप ट्रॉफीचे अनावरण करण्यासाठी आणि वेळापत्रक जाहीर करण्यासाठी एका समारंभाचे आयोजन केले होते. यात पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि झका अश्रफ यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित राहणार होते.

परंतु सोहळ्याच्या अर्धा तास आधी जय शहा यांनी सोशल मीडियावर आशिया चषकाच्या कार्यक्रमाची घोषणा केली. त्यामुळे पाकिस्तानला जगाला सांगण्यासारखे असेच काहीच राहिले नव्हते. याबाबत सूत्रांनी सांगितले की, पीसीबीने एसीसीला सांगितले होते की, ते लाहोरमध्ये समारंभ सुरू झाल्यानंतर पाच मिनिटांत आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर करेल; परंतु समारंभाच्या अर्धा तास आधी, जय शहा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यामुळे पीसीबीच्या कार्यक्रमातील हवाच निघून गेली.

आम्ही फक्त नावापुरते यजमान आहोत : पीसीबी

जय शहा यांनी आशिया चषकाचे वेळापत्रक लवकर जाहीर करण्याच्या निर्णयाने पीसीबीचे सर्व गणित बिघडले होते. कारण, वेळापत्रक आधीच जाहीर झाल्याने या कार्यक्रमाला काहीच अर्थ राहत नाही. आम्हाला करण्यासाठी काही शिल्लक ठेवणार की फक्त नावापुरतेच यजमान आहोत. या घटनेबाबत पीसीबीने एसीसीसमोर जाहीर नाराजी व्यक्त करत जय शहांवर गंभीर आरोप केला आहे. मात्र, गैरसमजातून हे सर्व घडल्याचे एसीसीकडून सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news