

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असलेल्या जगप्रसिध्द 'इंडियन प्रिमिअर लीग'ची (IPL) सुरूवात आजपासून झाली. मोठ्या दिमाखात या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यंदाच्या हंगामाचे वैशिष्ठ्ये म्हणजे प्रथमच जिओ टिव्हीने मराठी भाषेत कॉमेंट्री सुरू केली आहे. त्यामुळे आयपीएलच्या या हंगामाचा थरार आता 'मराठी' चाहत्यांना आपल्या मातृभाषेतून ऐकायला मिळणार आहे.
या हंगामातील पहिली लढत केकेआर विरूध्द आरसीबी अशी होत आहे. या सामन्यासाठी मराठमोळ्या केदार जाधवने प्रथमच मराठीतून कॉमेंट्री केली. त्याला ज्येष्ठ क्रिकेटपटू किरण मोरे यांची साथ लाभली आहे.