ऋषभ पंत ठरला 'आयपीएल'च्‍या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू !

IPL 2025 Auction : श्रेयसवर २६.७५ कोटींची बोली, चहल ठरला भारताचा महागडा फिरकी गोलंदाज
IPL 2025 Auction :
ऋषभ पंत.File photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग 'आयपीएल'च्‍या यंदाच्‍या हंगामासाठी लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात सुरु झाला आहे. आजपासून (दि. २४) हा लिलाव दोन दिवस चालणार आहे. या लिलावात 10 संघ निश्चित होणार आहेत. आजच्‍या लिलावात भारतीय खेळाडूंचा बोलबाला राहिला. श्रेयस अय्यरला पंजाबने २६.७५ कोटी रुपयांना खरेदी केले. यानंतर टीम इंडियाचा स्‍टार फलंदाज आणि यष्‍टीरक्षक ऋषभ पंत याने काही मिनिटांमध्‍ये श्रेयस अय्‍यरला पिछाडीवर टाकत आयपीएलमधील आजवरचा सर्वात महागडा खेळाडू म्‍हणून आपल्‍या नावाची नोंद केली. लखनौ संघाने ऋषभ पंतला २७ कोटींना खरेदी केले आहे. ( IPL 2025 Auction )

केएल राहुलसाठी दिल्‍लीने लावली १२ कोटींची बोली

केएल राहुलने 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीने लिलावात प्रवेश केला. राहुलसाठी आरसीबी आणि गतविजेत्‍या केकेआरमध्ये स्पर्धा होती. दिल्लीनेही राहुलमध्ये स्वारस्य दाखवले. दिल्लीने राहुलसाठी 11.50 कोटी रुपयांची बोली लावली, पण केकेआरही मागे हटायला तयार नव्हते. दिल्लीने राहुलसाठी १२ कोटींची बोली लावली, पण केकेआरने माघार घेतली. दरम्यान, सीएसकेने बोलीमध्ये उडी घेतली आणि राहुलसाठी बोली लावली. दिल्लीने 14 कोटींची बोली लावली आणि लखनऊने राहुलसाठी आरटीएमचा वापर केला नाही.

लिव्हिंगस्टोनसाठी आरसीबी बोली

ियाम लिव्हिंगस्टोनसाठी हैदराबाद आणि आरसीबीनेबोली लावली. मात्र, नंतर दिल्लीनेही लिव्हिंगस्टोनमध्ये रस दाखवला. लिव्हिंगस्टोनसाठी दिल्ली आणि आरसीबी यांच्यात स्पर्धा होती. आरसीबीने लिव्हिंगस्टोनसाठी 8.75 कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली.

सिराज गुजरातच्‍या ताफ्‍यात

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजसाठी गुजरात आणि सीएसकेमध्‍ये चुरशीची स्पर्धा झाली. सिराजची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती, मात्र अल्पावधीतच बोली 8 कोटींच्या पुढे गेली. सीएसकेने माघार घेतल्यानंतर राजस्थान रॉयल्सने बोलीमध्ये उडी घेतली. गुजरातने अखेर 12.75 कोटी रुपयांमध्ये सिराजला घेतले. आरसीबीने सिराजसाठी आरटीएमचा वापर केला नाही.

चहल ठरला भारताचा आयपीएलमधील सर्वात महागडा फिरकी गोलंदाज

भारतीय संघाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. आज चेन्नईने चहलवर बोली लावायला सुरुवात केली; पण गुजरातनेही चहलसाठी उत्सुकता दाखवली. पंजाबनेही चहलला घेण्यासाठी बोली लावली आणि त्याची गुजरातबरोबर रस्‍सीखेच सुरु झाली. त्याचवेळी लखनौनेही उडी घेतली. लखनौ आणि पंजाब यांच्यात चहलसाठी स्‍पर्धा सुरु झाली. पंजाबने चहलसाठी १४ कोटींची बोली लावली तेव्हा आरसीबी आणि हैदराबादनेही लिलावात उडी घेतली. चहलला घेण्यासाठी हैदराबाद आणि पंजाबमध्ये स्पर्धा लागली. अखेर पंजाबने चहलसाठी १८ कोटींची बोली लावली आणि हैदराबादने माघार घेतली. अशा प्रकारे चहल आयपीएल लिलावात विकला गेलेला भारताचा सर्वात महागडा फिरकी गोलंदाज ठरला.

डेव्हिड मिलर लखनौच्‍या संघात

डेव्‍डिड मिलरसाठी गुजरात आणि आरसीबी यांनी बोली लावली. मिलरची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सही या शर्यतीत सामील झाली. मिलरसाठी दिल्ली आणि आरसीबी आग्रही राहिले. यानंतर लखनौही यामध्‍ये सहभागी झाले. लखनौने मिलरसाठी 7.50 कोटी रुपयांची बोली लावली. गुजरातने मिलरसाठी आरटीएमचा वापर केला नाही तसे केले नाही. अखेर लखनौने मिलरला विकत घेतले.

मोहम्‍मद शमी हैदराबादने १० कोटींना खरेदी केले

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्‍म शमीची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. शमीला संघात घेण्‍यासाठी सीएसके आणि केकेआर यांच्यात रस्‍सीखेच होती. केकेआरने शमीसाठी ८.२५ कोटी रुपयांची बोली लावली. यानंतर सीएसकेने माघार घेतली. मात्र, चेन्नईने माघार घेतल्यानंतर लखनौने बोलीत उडी घेतली; पण केकेआरनेही हार मानली नाही. KKR ने 9.75 कोटी रुपयांची बोली लावल्‍यानंतर लखनौने माघार घेतली. शमी यापूर्वी गुजरातकडून खेळला होता, पण टायटन्सने त्याच्यासाठी आरटीएमचा वापर केला नाही; पण केकेआरने 10 कोटींच्या किमतीत माघार घेतली. हैदराबादने शमीला याच किंमतीत विकत घेतले.

ऋषभ पंतने काही मिनिटांमध्‍ये श्रेयस अय्यरला मागे टाकले, लखनौने केली २७ कोटी रुपयांना खरेदी

टीम इंडियाचा स्‍टार फलंदाज आणि यष्‍टीरक्षक ऋषभ पंत याने आयपीएलच्‍या लिलावातील बोलीत नवा विक्रम प्रस्‍थापित केला. आजच्‍या लिलावात त्‍याने काही मिनिटांमध्‍ये श्रेयस अय्‍यरला पिछाडीवर टाकत आयपीएलमधील आजवरचा सर्वात महागडा खेळाडू म्‍हणून आपल्‍या नावाची नोंद केली. लखनौ संघाने ऋषभ पंतला २७ कोटींना खरेदी केले आहे. श्रेयस अय्‍यरला 26.75 कोटी रुपयांची बोली लागली होती. ऋषभ पंतसाठी लखनौ आणि आरसीबी यांच्यात रस्‍सीखेच सुरु होती. पंत 2 कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता. अल्पावधीतच त्याची किंमत 10 कोटींच्या पुढे गेली. ऋषभ पंतला आपल्‍या संघात सहभागी करुन घेण्‍यासाठी हैदराबादही शर्यतीत सामील झाले; पण लखनौ शर्यतीमध्‍ये राहिले. हैदराबादचे मालक काव्या मारन आणि लखनऊचे मालक संजय गोयंका यांनी पंतसाठी लिलावाच्या टेबलावर बोली लावली आणि काही वेळातच त्याची किंमत १७ कोटींच्या पुढे गेली. लखनौने पंतसाठी 20.75 कोटी रुपयांची बोली लावली आणि हैदराबादने माघार घेतली. मात्र, दिल्लीने आरटीएमचा वापर केला. यानंतर लखनौने पंतसाठी २७ कोटींची ऑफर दिली आणि दिल्लीने माघार घेतली. अखेर लखनौने २७ कोटी रुपयांना ऋषभ पंतला आपल्‍या संघात घेतले.

दिल्लीने स्टार्कसाठी दिले ११.७५ कोटी

मिचेल स्टार्कची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. आज केकेआरने पुन्हा एकदा त्यांच्यासाठी बोली लावली, पण मुंबई इंडियन्सही या शर्यतीत कायम राहिली. दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबीनेही स्टार्कला घेण्यास स्वारस्य दाखवले. दिल्लीने स्टार्कला 11.75 कोटींना विकत घेतले. मागील वर्षीच्‍यालिलावात स्टार्कवर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लावली गेली होती. मात्र आज श्रेयस अय्‍यरने हा विक्रम मोडित काढला आहे.

गुजरातची बटलरवर १५.७५ कोटींची बोली

जोस बटलरची मूळ किंमत २ कोटी रुपये होती आणि त्याच्यासाठी पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात स्पर्धा होती. दरम्यान, लखनौ सुपरजायंट्सही शर्यतीत सामील झाले आणि त्यांची गुजरातशी टक्कर पाहिली. अखेर गुजरातने बटलरला १५.७५ कोटींना विकत घेतले. बटलरला राजस्थान रॉयल्स संघाने मुक्‍त केले होते.

Pudhari

श्रेयस अय्‍यर ठरला आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडूपैकी एक

श्रेयस अय्यर, ज्याने KKR ला त्याच्या नेतृत्वाखाली IPL 2024 चे विजेतेपद मिळवून दिले होते. तो आयपीएलच्‍या इतिहासातील लिलावात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा खेळाडू बनला. पंजाबने श्रेयसला २६.७५ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. श्रेयसची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. श्रेयस अय्यरला मिळविण्यासाठी सुरुवातीला दिल्ली आणि कोलकाता यांच्यात जोरदार स्‍पर्धा पाहण्‍यास मिळाली. या दोघांमध्ये पंजाब किंग्जनेही बोलीत उडी घेतली. यानंतर पंजाब आणि दिल्ली यांच्यात श्रेयस आणि केकेआरला मागे घेण्याची स्पर्धा लागली. श्रेयस लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा भारतीय खेळाडू तसेच आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. आहे अय्यरने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा विक्रम मोडला, ज्याला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपयांना अखेर विकत घेतले होते.

रबाडा गुजरातच्‍या संघात 

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला गुजरात टायटन्सने १०.७५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होता. रबाडा यापूर्वी आयपीएलमध्‍ये पंजाबकडून खेळला होता.

अर्शदीप सिंगसाठी तब्‍बल २० कोटींची बोली

टी-२० क्रिकेटमध्‍ये ९६ विकेटपर्यंत मजल मारलेल्‍या अर्शदीप सिंगसाठी मोठी बोली लागली. पंजाब किंग्सने राईट टू मॅच (आरटीएम) कार्ड वापरून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला 18 कोटी रुपयांना खरेदी केले. अर्शदीपवरची बोली चेन्नई सुपर किंग्जने सुरू केली होती. त्याला मिळवण्यासाठी चेन्‍नई सुपर किंग्‍ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये काही वेळ रस्‍सीखेच होती. राजस्थान आणि गुजरातनेही बोलीत उडी घेतली, पण अखेर सनरायझर्स हैदराबादने १५.७५ कोटींची बोली लावली. हैदराबादची बोली लागताच पंजाबला अर्शदीपसाठी आरटीएम वापरण्याबाबत विचारण्यात आले. पंजाबने आरटीएम कार्ड वापरुन हैदराबादने 18 कोटी रुपयांची ऑफर दिली ज्यासाठी पंजाबने होकार दिला.

कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक आहेत?

आयपीएलच्या दहा संघांकडे 641 कोटी आणि 50 लाख रुपये आहेत. यामध्ये पंजाब किंग्सकडे सर्वाधिक पैसा आहे. या संघाने केवळ 2 अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवले आहेत. त्यामुळे पंजाबकडे सर्वाधिक 110 कोटी 50 लाख रुपये शिल्लक आहेत. यानंतर, आरसीबी 83 कोटी रु., गुजरात टायटन्स- 69 कोटी रु. चेन्नई सुपर किंग्जकडे 55 कोटी, केकेआर 51 कोटी, सनरायझर्स हैदराबादकडे 45 कोटी, मुंबई इंडियन्सकडे 45 कोटी आणि राजस्थान रॉयल्सकडे 41 कोटी रुपये आहेत.

IPL 2025 Auction :
42 वर्षीय अँडरसनला IPL लिलावात कोण बोली लावणार?

लिलावात किती खेळाडूंवर बोली लावली जाईल?

आयपीएल लिलावासाठी 1574 खेळाडूंनी नोंदणी केली होती. या नंतर एकूण 574 खेळाडूंची निवड करण्यात आली. अंतिम टप्यामध्ये जोफ्रा आर्चरसह आणखी 3 नावे जोडली गेली, म्हणजे या लिलावात एकूण 577 खेळाडूंना बोली लावायची आहे. मोठी गोष्ट म्हणजे यापैकी 373 किंवा त्याहून अधिक खेळाडूंना निराशेचा सामना करावा लागू शकतो, कारण सर्व फ्रँचायझी मिळून जास्तीत जास्त २०४ खेळाडू खरेदी करू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news