

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग ( IPL 2025) स्पर्धेतील अनेक दिग्गज खेळाडू एकमेकांविरोधात मैदानात उत्कृष्ट क्रिकेटचे प्रदर्शन करत आहेत. आजवर या स्पर्धेत खेळाडूंमध्ये मैदानात वाद झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र सामना सुरु असतानाचा कॉमेंट्री करताना दोन माजी क्रिकेटपटूंमध्ये वाकयुद्ध रंगल्याचा प्रकार घडला आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध पंजाब किंग्ज (PBKS) सामन्यात माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू ( Navjot Singh Sidhu) आणि अंबाती रायुडू (Ambati rayudu) यांच्यातील शाब्दीक चकमक ही क्रिकेट विश्वातील चर्चेचा विषय ठरला आहे. या सामन्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जाणून घेवूया याविषयी...
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ला पंजाब किंग्ज (PBKS) कडून १८ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात धोनी फलंदाजीसाठी आला पण २७ धावा करून बाद झाला. तो त्याच्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. आता ज्यामध्ये माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू आणि अंबाती रायुडू यांच्यात वाद झाला. यावेळी सिद्धू यांनी केलेली कॉमेंट्री ही धोनी संदर्भात असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये आहे.
पंजाबविरुद्धच्या सामन्यात धोनी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. यावेळी कॉमेंट्री करताना नवजोत सिंग सिद्धू म्हणाले, 'धोनी आज धावत येत आहे. यावेळी त्याच्या कृतीतून हेतू स्पष्टपणे दिसून येतो. यावर अंबाती रायुडू म्हणाला, 'हो, अगदी!' धोनीची चाल पहा, तो बॅट नाही तर तलवार घेऊन येत आहे. आजच्या सामन्यात धोनी आपली तलवार चालवेल.
यावेळी सिद्धू म्हणाले, म्हणाला, 'अरे मित्रा, धोनी हा मैदानात फलंदाजी करायला येत आहेस की युद्ध लढायला?' यावर रायुडू म्हणतो, 'तुम्ही संघ बदलता तितक्या लवकर सरडाही आपला रंग बदलत नाही.' यावर सिद्धू म्हणाता 'जर सरडा कोणाचा आदर्श असेल तर तो तुमचा आहे.
नवज्योत सिंग सिद्धू ( Navjot Singh Sidhu) आणि अंबाती रायुडू (ambati rayudu) यांच्यातील शाब्दीक चकमक ही क्रिकेट विश्वातील चर्चेचा विषय ठरला आहे. या सामन्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर सिद्धू यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावरून अकांउटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते धोनीच्या विषयावर बोलत आहे. त्याच्यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिले आहे- 'धोनी क्रिकेट समोर आले आहेत गुरू? युद्ध नाही.'