पुढारी ऑनलाईन डेस्क : जोस बटलर आणि शेरफेन रदरफोर्ड यांच्यातील शानदार भागीदारीमुळे गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा सात विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने गुजरातसमोर २०४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. बटलरने ५४ चेंडूत ११ चौकार आणि चार षटकारांसह नाबाद ९७ धावा फटकावल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात खराब झाली. कर्णधार शुभमन गिल सात धावांवर धावबाद झाला. यानंतर, साई सुदर्शन आणि बटलर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. सुदर्शनने २१ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३६ धावा केल्या. सुदर्शन बाद झाल्यानंतर बटलर आणि रदरफोर्ड यांनी उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. बटलर आणि रदरफोर्ड यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी केली.३४ चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या. त्याला मुकेश कुमारने त्याला बाद केले.
रुदरफोर्डने रदरफोर्ड बाद झाल्यानंतर सामना रोमांचक परिस्थितीत पोहोचला. शेवटच्या षटकात गुजरातला जिंकण्यासाठी १० धावांची आवश्यकता होती. तेवतिया क्रीजवर उपस्थित होते. मिचेल स्टार्कच्या पहिल्या चेंडूवर तेवतियाने षटकार मारला आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून सामना संपवला; पण बटलरचे शतक हुकले. गुजरातने १९.२ षटकांत ३ बाद २०४ धावा करून सामना जिंकला. तेवतियाने ३ चेंडूत ११ धावा काढत नाबाद राहिला. दिल्लीकडून कुलदीप यादव आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर दिल्लीने पोरेल आणि केएल राहुलचे बळी लवकर गमावले. केएल राहुल १० वर्षांनी आयपीएलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला पण २८ धावा करून बाद झाला.दिल्लीकडून कर्णधार अक्षर पटेलने सर्वाधिक ३९ धावा केल्या. तथापि, शेवटी, आशुतोष शर्माने १९ चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या यामुळे संघ २०० धावांचा टप्पा ओलांडण्यात यशस्वी झाला. करुण नायरही १८ चेंडूत ३१ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर कर्णधार अक्षरने ट्रिस्टन स्टब्ससोबत चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली, परंतु सिराजने स्टब्सला बाद करून ही भागीदारी मोडली. २१ चेंडूत ३१ धावा काढून स्टब्स पॅव्हेलियनमध्ये परतला. मिचेल स्टार्क दोन आणि कुलदीप यादव चार धावांवर नाबाद राहिले. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णाने भेदक मारा केला. त्याने चार षटकांत ४१ धावा देत चार विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध सध्या पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे.